विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिह यांनी घेतली जैव तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक
Posted On:
09 JUL 2021 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2021
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भू विज्ञान (स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणु उर्जा आणि अवकाश राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले की कोविडने जैव तंत्रज्ञान आणि अनुवांशिक विज्ञानातील हस्तक्षेपाकडे लक्ष वेधले असून हे आमच्यासाठी धोरणात्मक संशोधन परिणामांवर काम करण्याची एक योग्य संधी देते जे विशेषत: भारत-केंद्रित आहेत आणि समकालीन आरोग्याच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.
नवीन मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या पहिल्या आढावा बैठकीत जैव तंत्रज्ञानाच्या वैज्ञानिकांना संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, भारतीय दृश्यस्वरूप आणि भारतीय अनुवांशिक लक्षणे ही उर्वरित जगापेक्षा भिन्न आहेत याचा विशेषत्वाने विचार करता भारताकडे संशोधनासाठी तसेच जगाला वैद्यकीय विशेष प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रचंड संसाधन साहित्य आहे. परिणामी, कोरोना विषाणूमुळे किंवा उत्परिवर्ती विषाणूंमुळे सध्या होणाऱ्या संक्रमणासह रोगपरिस्थिती विज्ञान तसेच रोगांचा नैदानिक अभ्यास या दोन्ही गोष्टी वेगळ्या असू शकतात आणि म्हणूनच, भारतीय रूग्णांसाठी भारतीय उपचार देण्याची जबाबदारी भारतीय संशोधक आणि वैज्ञानिकांवर देखील आहे.
वर्ष 2022 मध्ये भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्धापन दिनानिमित्त संशोधनात्मक आणि निश्चित निष्कर्ष आणि परिणामांसह पूर्ण होणारे कमीतकमी दोन विशेष प्रकल्प शोधून काढण्याचे आवाहन डॉ. जितेंद्रसिंग यांनी जैवतंत्रज्ञानाला केले.
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734311)
Visitor Counter : 278