युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
श्री अनुराग ठाकूर यांनी युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
08 JUL 2021 6:19PM by PIB Mumbai
श्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री म्हणाले की, त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आधीचे पदाधिकारी श्री. किरेन रिजिजू यांचे महान कार्य पुढे नेऊन देशातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे श्री. अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार क्रीडा क्षेत्रात युवकांचे योगदान वाढविण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रयत्न करू.
क्रीडा विभागाचे सचिव श्री रवी मित्तल आणि युवक कल्याण विभागाच्या सचिव सुश्री उषा शर्मा यांनी मंत्री महोदयांचे त्यांच्या दालनात स्वागत केले.
श्री अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर येथून भारतीय संसदेत (लोकसभा) चार वेळा निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी 31 मे 2019 पासून 7 जुलै 2021 पर्यंत अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. संसदेत त्यांनी माहिती तंत्रज्ञान वरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. 16 व्या लोकसभेदरम्यान, लोकसभेचे मुख्य प्रतोद म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि हा कार्यभार स्वीकारणारे ते सर्वात तरुण होते.
***
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733848)
Visitor Counter : 246