सांस्कृतिक मंत्रालय

श्री. जी. किशन रेड्डी यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.


श्रीमती. मीनाक्षी लेखी आणि श्री. अर्जुन राम मेघवाल यांनी देखील संस्कृती मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला

Posted On: 08 JUL 2021 7:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्लीतील शास्त्री भवन येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याचबरोबर श्रीमती. मीनाक्षी लेखी आणि श्री. अर्जुन राम मेघवाल यांनी संस्कृती मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.

श्री किशन रेड्डी यांना केंद्रीय पर्यटन मंत्री तसेच ईशान्य प्रांताच्या विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी गृह मंत्रालयात राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती.

माध्यमांशी बोलताना श्री रेड्डी म्हणाले की आम्ही पूर्ण वचनबद्धतेने पंतप्रधानांचा दृष्टिकोन साध्य करण्यासाठी काम करू.

श्री. किशन रेड्डी हे तेलंगणाच्या सिकंदराबाद मतदारसंघातून 2019 मध्ये 17 व्या लोकसभेत खासदार म्हणून निवडले गेले.

 

Shri @kishanreddybjp new Union Minister for Culture, Tourism & DoNER took charge of office today at @MinOfCultureGoI in New Delhi. Smt. @M_Lekhi and Shri @arjunrammeghwal also took charge as Ministers of State in M/o Culture. MoS, Sh @prahladspatel was also present.#Govt4Growth pic.twitter.com/9FJfEcYMto

— PIB Culture (@PIBCulture) July 8, 2021

 

श्री. रेड्डी यांनी बालकांमधील हृदयरोगाबाबत केलेल्या कार्यासारख्या विविध उपक्रमांचे नेतृत्व केले जे एक चळवळ बनले आणि त्यांना युनिसेफ (संयुक्त राष्ट्र संघ) कडून आंध्रप्रदेश विधानसभेतील सर्वोत्कृष्ट बाल-मित्र आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दहशतवादाविरूद्ध मोहीम देखील सुरू केली आणि दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय युवा परिषद (आयवायसीटी) आयोजित केली ज्यात 54 देशांमधून 193 हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यांनी सीमा सुरक्षा जागरण यात्रा’ ‘तेलंगाना पोरू यात्रादेखील आयोजित केली.

श्री रेड्डी यांना अमेरिकेच्या मेरीलँड इंडिया बिझिनेस राउंड टेबल (एमआयबीआरटी) तर्फे वर्ष 2009 चा उत्कृष्ट युवा नेतृत्व पुरस्कार प्राप्त झाला आणि जागतिक शांततेच्या योगदानासाठी बुल्गारियाच्या सोफिया येथे युनियन ऑफ बल्गेरियन कमांडोजने पदक बहाल केले.

***

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733825) Visitor Counter : 136


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu