राष्ट्रपती कार्यालय
थायलंड, रोमानिया, कझाकस्तान आणि तुर्कस्तान प्रजासत्ताक येथील राजदूतांकडून राष्ट्रपतींना नियुक्तीपत्रे सादर
Posted On:
07 JUL 2021 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2021
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना आज 7 जुलै 2021 रोजी थायलंड, रोमानिया, कझाकिस्तान प्रजासत्ताक व तुर्कस्तान प्रजासत्ताक येथील राजदूतांकडून आभासी कार्यक्रमात त्यांची नियुक्तीपत्रे सादर केली .
नियुक्तीपत्रे सादर करणाऱ्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे :
1. महामहीम श्रीमती पत्तरत होंगटोंग, राजदूत, थायलंड
2. महामहीम श्रीमती डॅनिला मरियाना सेझोनोव्ह, राजदूत, रोमानिया
3. महामहीम श्रीमान नुरलान झालगसबायेव, राजदूत कझाकस्तान
4. महामहीम श्रीमान, फिरत सुनेल, राजदूत, तुर्कस्तान प्रजासत्ताक
या समारंभ प्रसंगी बोलताना, राष्ट्रपतींनी थायलंड, रोमानिया, कझाकस्तान आणि तुर्कस्तान प्रजासत्ताक यांच्या राजदूतांना त्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, या सर्व देशांबरोबर भारताचे मैत्रीपूर्ण आणि सौहार्दाचे संबंध राहिले आहेत आणि शांतता तसेच समृद्धीच्या समान धाग्याने आपले संबंध खोलवर रूजले आहेत.
राष्ट्रपती म्हणाले की, आपले सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कोविड – 19 महामारीच्या काळात एक निर्णायक आणि समन्वित प्रतिसाद देण्याच्या जागतिक पातळीवरील प्रयत्नांमध्ये भारत आघाडीवर राहिला आहे. `फार्मसी ऑफ द वर्ल्ड़` म्हणून भारताने कोविड – 19 विरुद्धच्या जागतिक लढाईत अनेक देशांना आवश्यक औषधे आणि उपकरणे यांचा पुरवठा करण्यासाठी मदत केली आहे.
थायलंड, रोमानिया, कझाकस्तान आणि तुर्कस्तान प्रजासत्ताक यांच्या राजदूतांनी त्यांच्या नेत्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि भारताशी संबंध दृढ करण्यासाठी काम करीत राहण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
* * *
Jaydevi PS/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733353)
Visitor Counter : 312