ऊर्जा मंत्रालय

मध्य पूर्व आणि इतर प्रदेशांत फ्लाय अ‍ॅशची विक्री करण्यासाठी एनटीपीसी कडून इरादापत्रे आमंत्रित

Posted On: 04 JUL 2021 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2021

 

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील, केंद्रीय महारत्न सार्वजनिक सेवा कंपनी, राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ-एनटीपीसी लिमिटेडने आपल्या फ्लाय अ‍ॅश म्हणजेच वीजनिर्मितीच्या वेळी होणाऱ्या कोळशाच्या राखेचा संपूर्ण वापर करण्याच्या दृष्टीने, मध्यपूर्वेत आणि इतर प्रदेशात काही निश्चित बंदरांच्या मार्फत, या राखेची विक्री करण्यासाठी इच्छुकांकडून इरादापत्रे (एक्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवली आहेत. या विक्रीसाठीची निविदा, 1 जुलैला खुली झाली असून, ती 25 जुलै 2021 रोजी समाप्त होईल.

या राखेचा शाश्वत वापर व्हावा, या उद्देशाने एनटीपीसी ने सदर निविदा काढली असून, तिच्या वापरासाठी हा शाश्वत उपाय शोधण्यात आला आहे. 

फ्लाय अ‍ॅशचा पुरवठा करण्यासाठी एनटीपीसी लिमिटेड देशभरातील सिमेंट उत्पादकांशी समन्वयाने काम करत आहे. भारतीय रेल्वेच्या जाळ्याच्या मदतीने ही राख देशाच्या कानाकोपऱ्यात जलद गतीने, अत्यंत कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक मार्गाने पोचवली जाते.

बांधकाम उद्योगात फ्लाय अ‍ॅशपासून बनवलेल्या विटांचा वापर वाढावा या दृष्टीने एनटीपीसीने आपल्या कोळसा-आधारित औष्णिक वीज केंद्रात, फ्लाय अ‍ॅशपासून विटा तयार करण्याचा प्लांट उभारला आहे.  या विटा विविध प्रकल्पात, तसेच गृह-बांधकामातही वापरल्या जाऊ शकतात. एनटीपीसीच्या वीट बांधकाम प्रकल्पांत वर्षाला सरासरी 60 दशलक्ष विटा फ्लाय अ‍ॅशपासून बनवल्या जातात.

 

* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1732651) Visitor Counter : 60