विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

टीम इंडिया 2021 ने रिजनरॉन आंतरराष्ट्रीय विज्ञान व अभियांत्रिकी मेळाव्यात (आयएसईएफ) 9 पुरस्कार आणि 8 विशेष पुरस्कार प्राप्त

Posted On: 03 JUL 2021 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जुलै 2021

टीम इंडिया 2021 ने  प्रजातीतील अजैविक तणावाचा प्रतिकार करणाऱ्या जनुकांची ओळख पटविण्यापासून बिगर-वैद्यकीय व्यावसायिकांना  फुफ्फुसाची अचूक  तपासणी करण्याची परवानगी देणाऱ्या स्मार्ट स्टेथोस्कोप पर्यंतच्या नाविन्यपूर्ण संशोधनाबद्दल रिजनरॉन  आंतरराष्ट्रीय विज्ञान व अभियांत्रिकी मेळाव्यात  (आयएसईएफ)  9  पुरस्कार आणि 8 विशेष पुरस्कार जिंकले. हे अभिनव संशोधन तरुण विद्यार्थ्यांनी केले ज्यांना हे पुरस्कार देण्यात आले  आणि त्यांचे देशात भरभरून कौतुक झाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी)सचिव प्रा .आशुतोष शर्मा यांनी रिजनरॉन आंतरराष्ट्रीय विज्ञान व अभियांत्रिकी मेळाव्यात टीम इंडिया म्हणून  सहभागी झालेल्या  26 विजेत्यांशी  संवाद साधला ज्यांनी 'स्टेम-आयआरआयएस राष्ट्रीय मेळाव्यात संशोधन आणि अभिनव कल्पना मांडल्या.  या विद्यार्थ्यांनी जगातील 64 देश, प्रदेश आणि प्रांतामधील 1833 नवोदित वैज्ञानिकांशी  स्पर्धा केली आणि 17 पुरस्कार जिंकले.

प्राध्यापक शर्मा या प्रसंगी म्हणाले की, सर्जनशीलता ज्ञानाला जोडते. चाकोरीबाहेरील  सर्जनशील विचारवंत होऊन अशा ज्ञानापर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट आपण ठेवायला हवे. " त्यांनी सर्व प्रकल्पांची पाहणी केली आणि विजेत्यांचे  त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल कौतुक केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या एनसीएसटीसीचे प्रमुख,डॉ. प्रवीण अरोरा  आणि  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे वैज्ञानिक  सुजित बॅनर्जी यावेळी उपस्थित होते.

आयआरआयएसचे मेळावा संचालक  आणि एक्स्टेंम्पलर एज्युकेशन लिंकर्स फाऊंडेशनच्या सीओओ  शेरॉन ई. कुमार म्हणाल्या की  आयआरआयएस हे एक व्यासपीठ आहे जिथे नाविन्यतेचा  प्रवास साजरा होतो. आयआरआयएससारख्या कार्यक्रमांच्या यशामुळे देशात कौतुकाचा वर्षाव होतो आणि तरुण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचे दर्शन घडवण्याची संधी मिळते.

आयआरआयएस राष्ट्रीय मेळावा  यावर्षी व्हर्चुअल आयोजित करण्यात आला होता आणि त्यात 65,000 हून अधिक विद्यार्थी आणि विज्ञानाबाबत उत्साही लोकांचा सहभाग होता, ज्यात  सादर प्रकल्पांमध्ये विविध शास्त्रीय विषयांचे प्रतिनिधित्व करण्यात आले होते आणि 21 श्रेणींमध्ये त्यांच्या संशोधनाचे मूल्यमापन करण्यात आले. टीम इंडिया 2021  निवडण्यासाठी प्रत्येक प्रकल्पाला  कठोर मूल्यमापन  प्रक्रियेतून जावे लागले.  त्यानंतर  आयएसईएफमधील सहभागासाठी तयारी करण्यासाठी आयआरआयएस वैज्ञानिक समीक्षा समितीच्या सदस्यांनी या पथकाला  मार्गदर्शन केले.

‘आयआरआयएस राष्ट्रीय मेळावा ’हा एक्स्टेम्प्लर  एज्युकेशन लिंकर्स फाऊंडेशनचा कार्यक्रम आहे; ज्याला ब्रॉडकॉमकडून अर्थसहाय्य मिळते  आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी),मदत करते.  10 ते  17 या वयोगटातील शालेय विद्यार्थी अभिनव  प्रकल्पांसह यामध्ये सहभागी होऊ शकतात.

आयआरआयएस 5 राष्ट्रीय स्तरीय महामेळाव्यांशी संलग्न आहे - राष्ट्रीय बाल विज्ञान कॉंग्रेस (एनसीएससी); नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम (एनसीएसएम) चा  विज्ञान मेळा; राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) द्वारा जवाहरलाल नेहरू विज्ञान मेळावा; केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) विज्ञान प्रदर्शन; इनोव्हेशन इन सायन्स पर्सूट फॉर इंस्पायर्ड रिसर्च (INSPIRE) पुरस्कार कार्यक्रम.

देशभरातून सर्वोत्कृष्ट दर्जेदार प्रकल्प भारताचे प्रतिनिधित्व करतील आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्पर्धा करतील  यासाठी या मेळाव्यांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआरआयएस मेळाव्यात  सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या प्रत्येक मेळाव्यातून  निवडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार-विजेत्या प्रकल्पांना समुपदेशन आणि मूल्यांकन शिबिरांमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केले जाते.  आंतरराष्ट्रीय दर्जानुसार  प्रकल्प विकसित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते, त्यानंतर आयआरआयएस राष्ट्रीय मेळाव्यासाठी प्रत्येक मेळाव्यातून 5 प्रकल्पांची निवड केली जाते. 70: 30 मॉडेलचे अनुसरण केले जाते ज्यात  70 टक्के विद्यार्थ्यांना खुल्या स्पर्धेतून निवडले जाते आणि 30 टक्के इतर मेळ्यातील सर्वोत्कृष्ट 5 विद्यार्थ्यांमधून निवडले जातात.

 

Please Click the Annexure

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1732523) Visitor Counter : 284