संरक्षण मंत्रालय

परम विशिष्ट सेवा पदक , अति विशिष्ट सेवा पदक तसेच वायू सेना पदकप्राप्त एअर मार्शल विवेक राम चौधरी, यांनी हवाईदलाच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी स्विकारली

Posted On: 01 JUL 2021 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2021

 

एअर  मार्शल विवेक राम चौधरी यांनी 1 जुलै 2021 रोजी भारतीय हवाईदलाच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. भारतीय वायूसेनेच्या लढावू विमानांच्या तुकडीत 29 डिसेंबर 1982 रोजी एअर मार्शल चौधरी दाखल झाले होते. त्यांना 3800 तासांचा विविध प्रकारची लढावू विमाने तसेच प्रशिक्षणासाठीच्या विमानांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, याशिवाय मेघदूत आणि सफेद सागर सारख्या मोहिमेत ते सहभागी होते.

ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी तसेच वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.

भारतीय हवाईदलामधील आपल्या उल्लेखनीय कारकिर्दीत त्यांनी आघाडीवरील लढाऊ विमान ताफ्यांचे नेतृत्व तसेच महत्त्वाच्या हवाई तळांवर काम केले आहे. वायु सेनेतील एअर मार्शल म्हणून ते एअर फोर्स अकादमीचे कमांडंट, एअर स्टाफ ऑपरेशन्सचे सहायक प्रमुख आणि एअर स्टाफचे सहायक प्रमुख याही पदांवरही होते.  भारतीय वायूसेनेच्या हवाई मुख्यालयाचे उपप्रमुख आणि हवाई दलाच्या पूर्व विभागात वरिष्ठ हवाई अधिकारी अश्या मानाच्या पदांवरही याआधी त्यांची नेमणूक झाली आहे.  या आताच्या नेमणूकीपूर्वी ते हवाईदलाच्या पश्चिमी मुख्यालयाचे कमांडिंग-इन-चीफ म्हणून कार्यरत होते.

त्यांचे पूर्वसुरी एअर मार्शल एच एस अरोरा PVSM AVSM हे आपल्या  39 वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीनंतर 30 जून 2021 रोजी निवृत्त झाले. आपल्या हवाई कर्मचारी प्रमुखपदाच्या कारकीर्दीत त्यांनी लडाखमधील विकासाच्या वातावरणाला साथ देत अनेक प्रकारच्या सोयीं करण्यासाठी तात्काळ आणि उपयुक्त मदतीचा हात दिला होता.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हवाई दलाने माणूसकीच्या दृष्टीकोनातून विविध आपत्ती व्यवस्थापनादरम्यान सुटका आणि बचावकार्यात भाग घेतला, तसेच  भारतात किंवा विदेशात सुरू असलेल्या कोविड संबंधित कार्यातही महत्त्वाचा सहभाग घेतला.


* * *

M.Iyengar/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1731967) Visitor Counter : 299