आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण अद्ययावत माहिती


राज्यें व केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 32.92 कोटींहून अधिक मात्रा वितरीत.

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप 1.24 कोटी लस मात्रा शिल्लक

Posted On: 01 JUL 2021 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2021

 

संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि ते वेगवान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. कोविड लसीकरणाच्या सार्वत्रिकरणाचा नवीन टप्पा 21 जून 2021 पासून सुरू झाला. अधिकाधिक लसींची उपलब्धता, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्याकडील लससाठ्याचे नियोजन करता यावे म्हणून त्यांना देण्यात येणाऱ्या लससाठ्याची आगावू कल्पना देणे आणि लसपुरवठासाखळीचे सुसूत्रीकरण यातून लसमोहिमेला वेग देण्यात येत आहे.

संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्र  सरकार राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना विनामुल्य लसपुरवठा करत आहे. कोविड लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा म्हणून केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांनी उत्पादित केलेल्या लसींपैकी 75% लसीं घेऊन त्या राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य पुरवणार आहे.

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून विनामूल्य तसेच थेट प्रकारे आतापर्यंत 32.92 कोटींहून अधिक (32,92,01,800)  लसींच्या मात्रा विनामुल्य पुरवण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून आतापर्यंत  लसींच्या  31,67,50,891 मात्रा वापरल्या गेल्या आहेत.

1.24 कोटींहून अधिक म्हणजेच (1,24,50,909) कोविड लसींच्या मात्रा अजूनही राज्यांकडे वा केंद्रशासित प्रदेशांकडे वापरासाठी शिल्लक आहेत.

याशिवाय 94,66,420  पेक्षा जास्त लसींच्या मात्रा उपलब्ध होणार असून पुढील तीन दिवसांमध्ये त्या राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना वितरीत होतील.

 

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1731945) Visitor Counter : 299