Posted On:
30 JUN 2021 8:52PM by PIB Mumbai
- 33.28 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
- India reports 45,951 new cases in last 24 hours
- India's Active Caseload declines to 5,37,064
- Active cases constitute 1.77% of total cases
- 2,94,27,330 Total Recoveries across the country so far
- 60,729 patients recovered during last 24 hours
- Daily recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 48th consecutive day
- Recovery Rate increases to 96.92%
- Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.69%
- Daily positivity rate at 2.34%, less than 5% for 23 consecutive days
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 30 जून 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने काल एकूण 33 कोटी मात्रांचा टप्पा पार केला.सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या माहितीनुसार, 44,33,853 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून, लसीच्या एकूण 33,28,54,527 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात लसीच्या 36,51,983 मात्रा देण्यात आल्या.
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
भारतात गेल्या 24 तासात 45,951 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्या 50,000 च्या खाली नोंदविण्यात आली. केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतात सक्रिय रुग्ण संख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या आज 5,37,064 आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत 15,595 रुग्णांची निव्वळ घट झाली असून देशात नोंद झालेल्या एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण आता केवळ 1.77% आहे.
बहुतांश लोक कोविड -19 संसर्गातून बरे होत आहेत. भारतात सलग 48 दिवस दैनंदिन नवीन कोरोना रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 60,729 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात नोंदविण्यात आलेल्या दैनंदिन रुग्ण संख्येच्या तुलनेत 14,000 हून अधिक (14,778) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महामारीच्या सुरूवातीपासूनच संक्रमित लोकांपैकी, 2,94,27,330 जण यापूर्वीच कोविड--19 मधून बरे झाले आहेत.आणि गेल्या 24 तासात 60,729 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 96.92% असून हे प्रमाण सतत वाढीचा कल दर्शवत आहेत.
संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 19,60,757 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण, 41.01कोटी (41,01,00,044) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात एकीकडे चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे साप्ताहिक रुग्णसंख्येत सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.69% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.34% असून गेले सलग 23 दिवस हा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे.
इतर अपडेट्स :
महाराष्ट्र अपडेट :
मंगळवारी 8085 नवीन रुग्ण आणि 231 मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 1,17,098 सक्रिय रुग्ण आहेत. आज सकाळपर्यंत राज्यात 3.21 कोटी पेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गोवा अपडेट :
कोविड - मंगळवारी कोविड -19 चे 34 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे कोविड -19 बाधितांची एकूण संख्या 1,66,449 वर गेली आहे. गोव्यात सध्या 2241 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 96.82% आहे. मंगळवारी कोविडशी संबंधित दोन मृत्यू झाले असून राज्यातील मृतांचा एकूण आकडा 3048 झाला आहे. आज सकाळपर्यंत राज्यात 9.14 लाखाहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
Important Tweets
* * *
M.Chopade/D.Rane