आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरण-अद्ययावत माहिती
भारत सरकारकडून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 32.13 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रांचा पुरवठा
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 73 लाख मात्रा लसीकरणासाठी उपलब्ध
Posted On:
30 JUN 2021 11:10AM by PIB Mumbai
देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे जेणेकरुन ते लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करु शकतील आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.
देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. केंद्र सरकार कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करेल, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा पुरवठा विनामूल्य केला जाईल.
भारत सरकारने आतापर्यंत 32.13 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (32,13,75,820) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत. (विनामूल्य आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून)
यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून 31,40,75,654 मात्रा वापरल्या गेल्या आहेत. (आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार)
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 73 लाखांपेक्षा जास्त (73,00,166) मात्रांचा साठा लसीकरण करण्यासाठी उपलब्ध आहे.
याशिवाय, 24,65,980 लसींच्या मात्रा पुढील 3 दिवसात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होतील.
***
एचएफडब्ल्यू/कोविड राज्यनिहाय स्थिती/30 जून 2021/3
STupe/SampadaP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731391)
Visitor Counter : 375
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam