अर्थ मंत्रालय
जीएसटी अंमलबजावणीला 4 वर्ष पूर्ण होत असलेल्या पूर्वसंध्येला या यशासाठी योगदान देणाऱ्या करदात्यांचे सीबीआयसी अर्थात केन्द्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने मानले आभार
करदात्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी सीबीआयसी जारी करणार सन्मानपत्र
करदात्यांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा केन्द्र सरकारचा पुनरूच्चार
Posted On:
30 JUN 2021 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2021
वस्तू आणि सेवा कर, GST ही ऐतिहासिक कर सुधारणा 1 जुलै 2017 रोजी अंमलात आली. गेल्या काही वर्षात कर दरात घट होत आहे, कार्यपद्धती सुलभ झाली आहे तसेच वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे कर आधारातही लक्षणीय वाढ झाली आहे.
State/UT
|
Count of GSTIN
|
Maharashtra
|
15131
|
Karnataka
|
7254
|
Tamil Nadu
|
5589
|
Haryana
|
3459
|
West Bengal
|
2977
|
Telangana
|
2863
|
Rajasthan
|
2527
|
Uttar Pradesh
|
2179
|
Gujarat
|
2162
|
Punjab
|
1709
|
Madhya Pradesh
|
1694
|
Kerala
|
1385
|
Delhi
|
1163
|
Uttarakhand
|
895
|
Assam
|
583
|
Bihar
|
551
|
Andhra Pradesh
|
516
|
Goa
|
436
|
Chandigarh
|
361
|
Chattisgarh
|
192
|
Dadra and Nagar Haveli
|
181
|
Odisha
|
128
|
Tripura
|
104
|
Jharkhand
|
96
|
Meghalaya
|
88
|
Himachal Pradesh
|
60
|
Pondicherry
|
47
|
Sikkim
|
44
|
Jammu and Kashmir
|
32
|
Mizoram
|
24
|
Arunachal Pradesh
|
2
|
Nagaland
|
2
|
Andaman and Nicobar Islands
|
2
|
Manipur
|
1
|
Lakshadweep Islands
|
1
|
Ladakh
|
1
|
Total
|
54,439
|
जीएसटी महसुलात सातत्यपूर्ण वाढ होत आहे. सलग आठ महिने 1 लाख कोटी पेक्षा अधिक महसुलाचा टप्पा गाठला आहे.
जीएसटी अंमलबजावणीला 4 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच्या पूर्वसंध्येला जीएसटीच्या यशोगाथेत योगदान देणाऱ्या करदात्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वेळेवर कर परतावा भरत वस्तू आणि सेवा कराबाबत मोलाचे योगदान देणाऱ्या करदात्यांची माहिती, केन्द्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने गोळा केली. यासाठी मंडळाने 54,439 ( चोपन्न हजार चारशे एकोणचाळीस) करदाते निवडले आहेत. यातले 88% हून अधिक करदाते सूक्ष्म (36%), लघु (41%) आणि मध्यम उद्योगांचे (11%) प्रतिनिधीत्व करणारे आहेत. सर्व राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांमधील वस्तू आणि सेवा क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पुरवठा प्रक्रीयेत हे सक्रीय आहेत.
प्रामाणिक करदात्यांकडून गोळा केल्या जाणाऱ्या महसुलातूनच देशातील कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांची विकासकामे तसेच विविध सामाजिक क्षेत्रातली कामे केली जातात याची नोंद सर्वचजण घेतात. मात्र विशेष योगदानासाठी थेट जीएसटी करदात्यांशी संवाद साधण्याचा सरकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. योगदानाची दखल घेण्यासाठी केन्द्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ करदात्यांना सन्मानपत्र देणार आहे. वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN)शी संबंधित प्रत्येक करदात्याला हे सन्मानपत्र इमेल द्वारे पाठवणार आहे. करदाते याची प्रिंट (छापील प्रत) काढून हे सन्मानपत्र दर्शनीभागात लावू शकतात.
केन्द्र सरकार करदात्यांच्या सेवेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याचवेळी करदात्यांनीही मजबूत, समर्थ भारताच्या उभारणीसाठी योगदान देत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731694)
Visitor Counter : 264