आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य संशोधन क्षेत्रात भारत आणि नेपाळ यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 30 JUN 2021 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जून 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), भारत आणि नेपाळ आरोग्य संशोधन परिषद (एनएचआरसी), नेपाळ यांच्यात अनुक्रमे 17 नोव्हेंबर 2020 आणि 4 जानेवारी 21 रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली.

सीमेपलीकडील आरोग्य समस्या, आयुर्वेद/पारंपारिक औषध आणि औषधी वनस्पती, हवामान बदल आणि आरोग्य, असंसर्गजन्य रोग, मानसिक आरोग्य, लोकसंख्या आधारित कर्करोग रजिस्ट्री, उष्णकटिबंधीय रोग (डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, जेई इत्यादींसारख्या वेक्टर जनित रोग), इन्फ्लूएंझा, क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री, आरोग्य संशोधन नीतीमत्ता, ज्ञान, स्किल टूल्स, विद्यार्थी यांच्या  देवाणघेवाणीतून क्षमता निर्मिती आणि साधने, मार्गदर्शक तत्त्वे, प्रोटोकॉल आणि आरोग्य संशोधनाशी संबंधित पद्धती स्वीकारण्यासाठी सहकार्य यासारख्या परस्पर हिताच्या  संयुक्त संशोधन उपक्रमांवर सहकार्य हे या कराराचे उद्दिष्ट आहे.

प्रत्येक देश या सामंजस्य करारानुसार मंजूर संशोधनाच्या घटकांना त्यांच्या देशात संशोधन करण्यासाठी निधी देईल किंवा त्रयस्थ पक्षाच्या निधीसाठी संयुक्तपणे अर्ज करु शकेल. मंजूर सहकार्य प्रकल्पांतर्गत वैज्ञानिकांच्या प्रवासाचा खर्च वैज्ञानिक पाठवणारा देश करेल तर  यजमान देश वैज्ञानिक/संशोधकाचा निवास आणि राहण्याचा खर्च करेल. त्या वेळी उपलब्ध असलेल्या निधी नुसार कार्यशाळा/सभा व संशोधन प्रकल्पांसाठी निधीची वचनबद्धता वेळोवेळी निश्चित केली जाऊ शकते. या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीची व्यवस्था उपक्रम सुरू होण्यापूर्वी दोन्ही पक्षांकडून मान्य केली जाईल.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1731576) Visitor Counter : 39