अर्थ मंत्रालय
अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण यांनी भांडवली खर्च आणि पायाभूत सुविधांच्या पथदर्शी आराखड्याबाबत घेतली 6 वी आढावा बैठक
Posted On:
29 JUN 2021 8:41PM by PIB Mumbai
पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर आज केन्द्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आभासी बैठक घेतली. पायाभूत सुविधा पथदर्शी आराखड्याबाबत मंत्रालये/विभाग यांच्याबरोबरची अर्थमंत्र्यांची ही सहावी आढावा बैठक होती.
मंत्रालये आणि त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या भांडवली खर्चाबाबत अर्थमंत्र्यांनी आढावा घेतला. महामारी नंतर अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी संबंधितांचा वाढीव भांडवली खर्च महत्वाची भूमिका वठवेल यावर त्यांनी भर दिला. मंत्रालयांनी आपला भांडवली खर्चाचा भार वाढवावा असं सांगतानाच याबाबतचे लक्ष्य साध्य करावे असेही सांगितले.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पासाठी 5.54 लाख कोटी रुपये भांडवल उपलब्ध केले आहे, 2020-21 च्या तुलनेत तब्बल 34.5% वाढ नोंदली गेली आहे असे श्रीमती सितारमण यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनीही भांडवली खर्च वाढवण्याच्या प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
***
M.Chopade/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731258)