संरक्षण मंत्रालय
तंत्रज्ञान अंत:पोषण मंचासाठी (TIF) भारतीय नौदल आणि मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
29 JUN 2021 8:37PM by PIB Mumbai
भारतीय नौदल आणि मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, बंगळुरु यांच्यात 29 जून 2021 रोजी संरक्षण मंत्रालयाच्या (नौदल) एकात्मिक मुख्यालय, दिल्ली इथे तंत्रज्ञान अंत:पोषण मंचासाठी संयुक्त करार झाला. यामंचाद्वारे भारतीय नौदल आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, अभिनव तंत्रज्ञानाच्या विकासासाठी नवोन्मेषी सृजन केले जाईल.
या मंचाअंतर्गत शस्त्रास्त्र आणि सेन्सर्स, माहिती तंत्रज्ञान तसेच अभिनव तंत्रज्ञान जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निग, क्वांटम कम्पुटिंग, स्वायत्त रोबोटिक्स, इमेज प्रोसेसिंग आणि कॉग्निटिव्ह रेडीओ या क्षेत्रात विकासाचे काम केले जाईल. स्टार्ट अप्स आणि अकादमी संस्थांच्या समन्वयाने केन्द्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियान उपक्रमाचा हा भाग आहे.
***
M.Chopade/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731254)
Visitor Counter : 224