अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
आत्मनिर्भर भारत अभियान योजने अतंर्गत, प्रधानमन्त्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग उन्नती योजनेला एक वर्ष पूर्ण
Posted On:
29 JUN 2021 4:13PM by PIB Mumbai
अन्न प्रक्रीया उद्योगातील असंघटित गटात सध्या व्यक्तिगत पातळीवर कार्यरत सूक्ष्म उद्योगात स्पर्धा वाढवणे आणि या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजनेने एक वर्ष पूर्ण केले आहे.
पीएमएफएमई योजने अतंर्गत मैलाचा गाठला टप्पा
एक जिल्हा एक उत्पादन
पीएमएफएमई योजनेच्या एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) घटका अंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने राज्ये/केन्द्र शासित प्रदेशांद्वारे प्राप्त शिफारशीनुसार 137 वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांसह 35 राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांतील 707 जिल्ह्यांकरीता ओडीओपीला मंजूरी दिली आहे.
समन्वय
पीएमएफएमई योजनेअंतर्गत अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने ग्राम विकास मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि गृहनिर्माण तसेच शहरी कार्य मंत्रालया सोबत तीन संयुक्त पत्रांवर स्वाक्षरी केली आहे.
योजनेच्या नोडल बँकेच्या रुपात यूनियन बँक ऑफ इंडिया बरोबर एक करार केला आहे. 11 बँकासह पीएमएफएमई योजनेकरीता आधिकृत कर्ज घेणाऱ्या भागीदारांच्या रुपात करारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
क्षमता बांधणी आणि अंत:पोषण केन्द्र
पीएमएफएमई योजने अतंर्गत, क्षमता बांधणी घटकाखाली, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM) आणि अन्न प्रक्रीया तंत्रज्ञान संस्था (IIFPT) प्रशिक्षण तसेच संशोधन विषयक सहकार्यात मोलाची भूमिका वठवत आहेत.या अंतर्गत 18 राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांत 371 तज्ञ प्रशिक्षणार्थीं आणि 469 जिल्हा पातळीवरील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण घेेतले असून इतर राज्यात ही प्रक्रीया सुरु आहे.
अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाने आईआईएफपीटीच्या सहयोगाने समान अंत:पोषण केन्द्रांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल आणि देशभरात अंत:पोषण केन्द्राच्या तपशीलाच्या सुविधेसाठी एक ऑनलाइन समान अंत:पोषण केन्द्र नकाशा विकसित केला आहे.
बीज भांडवल
पीएमएफएमई अंतर्गत बचत गटांना बीज भांडवल उपलब्ध केले जाते. यासाठी राज्य पातळीवर कार्यरत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) आणि राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (SRLMs) सहकार्य घेतले जाते. आतापर्यंत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने राज्य नोडल संस्थेला (SNA) 43,086 बचतगट सदस्यांना 123.54 कोटी रुपये भांडवल देण्याची शिफारस केली आहे. एसएनएने 8040 सदस्यांना बीज भांडवल मंजूर केले असून 25.25 कोटी रुपयांचे वाटप एसआरएलएमला झाले आहे.
विपणन आणि नाममुद्रा प्रचार
प्रत्येकी 10 उत्पादनांच्या विपणन आणि नाममुद्रा प्रचारासाठी नाफेड आणि ट्रायफेड यांच्याबरोबर या योजने अतंर्गत सामंजस्य करार केला आहे.
https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Home-Page
***
M.Chopade/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731241)
Visitor Counter : 368