संरक्षण मंत्रालय

आय एन एस तबर या भारतीय युद्ध नौकेची इजिप्तच्या अलेक्झांड्रिया बंदराला भेट

Posted On: 29 JUN 2021 4:49PM by PIB Mumbai

 

आय एन एस तबर ही  भारतीय नौदलाची आघाडीवरील  विनाशिका 27 जून 2021 रोजी इजिप्तच्या अलेक्झांड्रिया इथे दाखल झाली. सदिच्छा भेटीचा भाग म्हणून ही विनाशिका तिथे दोन दिवस होती.  भारत आणि इजिप्तमध्ये उत्तम द्विपक्षीय संबंध आहेत आणि भारतीय नौदलाची जहाजे नियमितपणे अलेक्झांड्रिया बंदराला भेट देतात.

आय एन एस तबर वरील मुख्य अधिकारी (कमांडिंग ऑफिसर) कॅप्टन एम महेश आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांनी अलेक्झांड्रिया येथील अज्ञात सैनिकांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले. कमांडिंग ऑफिसरनी अलेक्झांड्रिया नौदल तळाचे कमांडर रियर ॲडमिरल आयमान- अल -दारी यांची भेट घेतली.

बंदरातून निघण्यापूर्वी आय एन एस तबरने  इजिप्शन नौदलाच्या तौष्का या युद्ध नौकेसोबत सागरी संयुक्त सरावात भाग घेतला. या सरावात डेक लँडिंग ऑपरेशन्स व समुद्राखालील पुनर्भरण ड्रिल्सचा समावेश होता.

समुद्रावरील या सरावादरम्यान भारतीय नौदल आणि इजिप्शियन नौदल यामधील सहकार्य आणि परस्परमेळ वाखाणण्याजोगा होता.

आय एन एस तबरची ही सदिच्छा भेट उभय देशांमधील बंध दृढ करण्यासाठी तसेच संबध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने नवीन मार्ग शोधण्याच्या दृष्टीने आखली  होती.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1731162) Visitor Counter : 341