आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरणाविषयी अद्ययावत माहिती- 160 वा दिवस


आजवर एकूण 30.72 कोटींहून अधिक व्यक्तींचे लसीकरण पूर्ण

कोविड-19 लसीकरणाच्या नवीन टप्प्याच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत देण्यात आल्या 54.07 लाखांहून अधिक मात्रा

आतापर्यंत 18-44 वर्षे वयोगटास दिल्या गेल्या 7.59 कोटींहून अधिक मात्रा

Posted On: 24 JUN 2021 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2021

 

भारतात आजवर एकूण 30.72 कोटींहून अधिक (30,72,46,600) व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती आज संध्याकाळी सात वाजताच्या तात्कालिक अहवालात देण्यात आली आहे. दि. 21 जून रोजी सुरु झालेल्या कोविड लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात आज, लसीच्या 54.07 लाखांहून अधिक (54,07,060) मात्रा टोचण्यात आल्या. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तयार झालेल्या तात्कालिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

आज 18-44 वर्षे वयोगटात 35,44,209 जणांना पहिली मात्रा देण्यात आली तर 67,627 व्यक्तींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. आजवर 37 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 7,43,45,835 कोटी व्यक्तींना पहिली मात्रा टोचण्यात आली आहे. तर लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाल्यापासून एकूण 15,70,839 व्यक्तींना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड,  कर्नाटक,केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, ओदिशा, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी 18-44 वयोगटाच्या 10 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा दिली आहे.

18-44 वर्षे वयोगटाच्या लसीकरणात आजवर टोचल्या गेलेल्या मात्रांची एकूण संख्या पुढील सारणीत दिलेली आहे:

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

31237

0

2

Andhra Pradesh

1381806

7828

3

Arunachal Pradesh

170150

0

4

Assam

2007981

119621

5

Bihar

4793280

74791

6

Chandigarh

156012

0

7

Chhattisgarh

1571338

50633

8

Dadra & Nagar Haveli

102194

0

9

Daman & Diu

108407

0

10

Delhi

1907664

150940

11

Goa

260848

3678

12

Gujarat

6277270

154509

13

Haryana

2654118

59597

14

Himachal Pradesh

666692

0

15

Jammu & Kashmir

671965

29013

16

Jharkhand

1739549

55939

17

Karnataka

5260247

46599

18

Kerala

1652227

7250

19

Ladakh

71953

0

20

Lakshadweep

21610

0

21

Madhya Pradesh

7517303

131769

22

Maharashtra

4565978

247145

23

Manipur

125113

0

24

Meghalaya

188544

0

25

Mizoram

206769

0

26

Nagaland

169631

0

27

Odisha

2321023

130008

28

Puducherry

154601

0

29

Punjab

1190617

4614

30

Rajasthan

5806101

4639

31

Sikkim

175059

0

32

Tamil Nadu

4275722

37476

33

Telangana

3088097

18317

34

Tripura

707981

11380

35

Uttar Pradesh

7732633

165759

36

Uttarakhand

1070046

33269

37

West Bengal

3544069

26065

 

Total

7,43,45,835

15,70,839


* * *

S.Patil/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1730153) Visitor Counter : 156