आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड 19 लसीकरण : गैरसमज वि. वस्तुस्थिती
ज्यांच्याकडे नऊ निर्दिष्ट केलेली ओळखपत्र नाहीत किंवा मोबाईल फोन नाही त्यांच्यासाठी लसीकरण सत्र आयोजित करण्यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत
वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी घराजवळ लसीकरण सेवा देखील पुरवण्यात आली
आदिवासी/ग्रामीण जिल्ह्यांमध्ये कोविड 19 लसीकरण व्याप्ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली आहे
Posted On:
23 JUN 2021 3:52PM by PIB Mumbai
तांत्रिक आवश्यकतांच्या अनुपलब्धतेमुळे बेघर लोकांना ‘कोविड -19’ लसीकरणासाठी नोंदणी करण्यापासून 'जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले आहे’ असा आरोप काही माध्यमांनी केला आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, ‘डिजिटल पद्धतीने नोंदणी करण्याची आवश्यकता’, ‘इंग्रजीचे ज्ञान आणि संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे इंटरनेट जोडणी’ हे काही घटक लोकांना लसीकरणापासून वंचित ठेवतात.
हे दावे निराधार आहेत आणि वस्तुस्थितीवर आधारित नाहीत. हे स्पष्ट करण्यात येत आहे की:
- कोविड लसीकरणासाठी मोबाईल फोनची मालकी असणे ही पूर्वअट नाही.
- लसीकरणासाठी निवासी पत्ता तयार करणे देखील अनिवार्य नाही.
- लस घेण्यासाठी को-विनवर ऑनलाईन पूर्व नोंदणी करणे बंधनकारक नाही.
- वापरकर्त्यांच्या सुलभतेसाठी, को-विन आता 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराती, ओडिया, बंगाली, आसामी, गुरुमुखी (पंजाबी) आणि इंग्रजी यांचा समावेश आहे.
को-विन प्लॅटफॉर्म ही सर्वसमावेशक आयटी प्रणाली आहे, जी देशाच्या दुर्गम भागात तसेच सर्वाधिक असुरक्षित भागात लसीकरण सुलभ करण्यासाठी सर्व आवश्यक वैशिष्ट्यांसह एक लवचिक व्यवस्था प्रदान करते. नऊ ओळखपत्रांपैकी आधार, मतदार ओळख पत्र, फोटोसह रेशन कार्ड, दिव्यांग ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र, लसीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे, मात्र ज्यांच्याकडे या नऊ पैकी एकही ओळखपत्र नाही किंवा मोबाईल फोन नाही त्यांच्यासाठी लसीकरण सत्र आयोजित करण्याची विशेष तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.
या तरतुदींचा पूर्ण लाभ घेत आतापर्यंत अशा 2 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी घराजवळ लसीकरण केंद्र सेवा देखील पुरवली जात आहे.
[https://www.mohfw.gov.in/pdf/GuidanceNeartoHomeCovidVaccinationCentresforElderlyandDifferentlyAbledCitizens.pdf]
ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा स्मार्ट फोन किंवा साधा मोबाइल फोन नाही त्यांच्यासाठी ऑन साइट मोफत नोंदणी (ज्याला वॉक-इन देखील म्हटले जाते) सुविधा आहे आणि लसीकरण सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध आहे. आतापर्यंत सर्व लसीपैकी 80% ऑन - साइट लसीकरण मार्गे देण्यात आल्या आहेत.
शिवाय, आदिवासी जिल्ह्यात कोविड 19 लसीकरण व्याप्ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली असल्याचे दिसून आले आहे.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729734)
Visitor Counter : 315