PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 22 JUN 2021 8:18PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • India administered 86.16 lakh vaccine doses in a single day; Highest ever single day vaccination achieved in the world so far
  • 28.87 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India reported 42,640 new cases in the last 24 hours; less than 50,000 in 91 days
  • India's Active Caseload declines to 6,62,521; less than 7 lakh after 79 days
  • 2,89,26,038 Total Recoveries across the country so far
  • 81,839 patients recovered during last 24 hours
  • Daily recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 40th consecutive day
  • Recovery Rate increases to 96.49%
  • Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 3.21%
  • Daily positivity rate at 2.56%, less than 5% for 15 consecutive days

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 22 जून 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

देशभरात एका दिवसात एकूण 86.16 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून जगातील एका दिवसातील ही विक्रमी संख्या आहे. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 28.87 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 42,640 नव्या रुग्णांची नोंद; 91 दिवसात संख्या 50 हजारापेक्षा कमी आहे.

सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती 6,62,521 वर पोहचली;  79 दिवसानंतर ही संख्या 7 लाखापेक्षा कमी आहे.

देशात आतापर्यंत एकूण 2,89,26,038 जण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 81,839 जण बरे झाले आहेत. सलग 40 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बरे होण्याचा दर वाढून 96.49% वर पोहोचला आहे.

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून सध्या तो 3.21% वर पोहोचला आहे.

दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.56%, सलग 15 व्या दिवशी तो 5% पेक्षा कमी आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ; एकूण – 39.40 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

इतर अपडेट्स :

 

महाराष्ट्र अपडेट:

महाराष्ट्र सरकारने  सरकारी रुग्णालयांमध्ये 18 ते  29 वर्षे वयोगटासाठी मोफत कोविड 19 लसीकरण पुन्हा  सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना राज्यातील सरकारी रुग्णालयात मोफत लस मिळू शकेल. महाराष्ट्रात सोमवारी 6,270 नवे कोरोना बाधित  रुग्ण आढळले असून मागील चार महिन्यांतील ही एका दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. कोरोनाबाधितांची एकूण  संख्या 59,79,051 वर पोहचली आहे, तर  94 मृत्यूंमुळे मृतांचा एकूण आकडा 1,18,313 वर गेला आहे. राज्यात सध्या 1,24,398 उपचाराधीन रुग्ण  असून रुग्ण बरे होण्याचा दर 95.89 टक्के आहे.  अत्यंत संसर्गजन्य  मानल्या जाणाऱ्या कोविड 19 च्या  'डेल्टा प्लस' प्रकारातील एकवीस रुग्ण आतापर्यंत राज्यात आढळले आहेत.  तर आतापर्यंत राज्यात म्युकरमायकोसिसचे  7,998 रुग्ण आढळले आहेत आणि कालपर्यंत 729 जणांचा या आजाराने  बळी घेतला आहे. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार यापैकी  4,398 रुग्णांवर उपचार सुरु  आहेत.

 

गोवा अपडेट:

गोव्यातील कोविड-19 रुग्णसंख्या  सोमवारी 218 ने वाढून 1,64,654  वर पोहोचली तर सात जणांच्या मृत्युसह एकूण मृत्यूची संख्या 2,997  वर पोहोचली.  दिवसभरात  413 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  आतापर्यंत 1,58,591 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  राज्यात 3,066  उपचाराधीन रुग्ण आहेत.

Important Tweets

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S. Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1729496) Visitor Counter : 170