रेल्वे मंत्रालय

शहरे हळूहळू अनलॉक होत असल्यामुळे कामगारांना परत आणण्यासाठी रेल्वेकडून मदत


गेल्या 7 दिवसांत स्थलांतरित मजूर आणि अन्य प्रवाशांसह सुमारे 32.56 लाख प्रवाशांनी रेल्वे प्रवास केला

Posted On: 19 JUN 2021 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2021


शहरे हळू हळू पूर्वपदावर येत असल्यामुळे कामगारांना परत आणण्यासाठी रेल्वे मदत करत आहे.

गेल्या 7 दिवसांत (11.6.21 ते 17.6.21) स्थलांतरित मजूर आणि अन्य प्रवाशांसह सुमारे 32.56 लाख प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमधून पूर्व उत्तर प्रदेश , बिहार, झारखंड, बंगाल आणि ओदिशासारख्या भागातून दिल्ली, मुंबई, पुणे, सूरत, अहमदाबाद आणि चेन्नई या भागांसह विविध ठिकाणी प्रवास केला

स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यातून कामाच्या ठिकाणी जाता यावे यासाठी  भारतीय रेल्वे मेल / एक्सप्रेस स्पेशल, हॉलिडे स्पेशल आणि उन्हाळा  विशेष गाड्या चालवत आहे. या सर्व गाड्या कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन पूर्णपणे राखीव गाड्या म्हणून चालवल्या जात आहेत.

भारतीय रेल्वेकडून  18.06.2021 पर्यंत ,983  मेल / एक्सप्रेस आणि हॉलिडे स्पेशल (कोविड-पूर्व  स्तराच्या 56%) चालवण्यात येत  आहेत. याव्यतिरिक्त, कामाच्या ठिकाणी परत जाण्याची इच्छा असलेल्या लोकांच्या सुलभ वाहतुकीसाठी सुमारे 1309 उन्हाळा  विशेष गाड्या देखील चालवण्यात आल्या आहेत. या उन्हाळी विशेष गाड्या प्रामुख्याने  बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा  आणि आसाम यासारख्या राज्यांमधील प्रवाशांना  दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, पुणे, बंगळुरू इत्यादी प्रमुख शहरांशी जोडत आहेत.

पुढच्या दहा दिवसांत (19.6.21 ते  28.6.21 पर्यंत)  स्थलांतरित मजूर  आणि इतर प्रवाशांसह अंदाजे 29.15 लाख प्रवाशांनी पूर्व उत्तर प्रदेश , बिहार, झारखंड, बंगाल आणि ओडिशा या भागातून दिल्ली, मुंबई, पुणे, सूरत, अहमदाबाद आणि चेन्नई सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण केले आहे.

निश्चित मागणी जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार कामगारांच्या सुलभ वाहतुकीसाठी विभागीय  रेलवे विविध उद्योग संघटना आणि व्यापाऱ्यांशी  सक्रियपणे समन्वय साधत आहेत.

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728610) Visitor Counter : 219