पंतप्रधान कार्यालय
लोकसभा अध्यक्ष म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले
Posted On:
19 JUN 2021 5:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2021
लोकसभा अध्यक्ष म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल ओम बिर्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
"गेल्या दोन वर्षात, ओम बिर्ला यांनी आपल्या संसदीय लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या आणि उत्पादकता वाढवणार्या अनेक उपाययोजनाची सुरूवात केली, ज्यामुळे अनेक ऐतिहासिक तसेच लोकाभिमुख विधेयके मंजूर झाली. त्यांचे अभिनंदन!
हे लक्षात घेण्यासारखे आहे की ओम बिर्ला यांनी प्रथमच खासदार बनलेल्या युवा खासदार आणि महिला खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यावर विशेष भर दिला आहे. आपल्या लोकशाहीमध्ये ज्यांची भूमिका महत्वाची आहे, अशा विविध समित्यांनाही त्यांनी बळकटी दिली आहे.", असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728559)
अभ्यागत कक्ष : 259
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam