रेल्वे मंत्रालय

वाढलेली मागणी लक्षात घेऊन जून 2021 मध्ये भारतीय रेल्वेकडून आणखी 660 रेल्वेगाड्यांना मान्यता

Posted On: 18 JUN 2021 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2021

कोरोना महामारीचा प्रभाव कमी होऊ लागल्याने जनतेला प्रवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी, स्थलांतरित मजुरांना ये-जा करण्यासाठी आणि विविध गंतव्य स्थानांसाठी असलेल्या प्रतीक्षा यादीचा निपटारा करण्यासाठी भारतीय रेल्वे विशेष रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करत आहे.

कोविडपूर्वीच्या काळात दररोज सरासरी 1768 मेल/ एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे परिचालन सुरू होते.

18-6-2021 रोजीच्या आकडेवारीनुसार सध्या दररोज 983 मेल/ एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे परिचालन सुरू असून हे प्रमाण कोविडपूर्व काळातील परिचालनाच्या सुमारे  56%  आहे. मागणीनुसार आणि व्यावसायिक औचित्य विचारात घेऊन रेल्वेगाड्यांच्या संख्येत हळूहळू वाढ करण्यात येत आहे.

1-6-2021 रोजी सुमारे 800 मेल/ एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे परिचालन सुरू होते. 1-6-2021 ते 18-6-2021 या दरम्यान अतिरिक्त 660 मेल/ एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे परिचालन करण्यास विभागीय रेल्वेंना मान्यता देण्यात आली आहे. याचा तपशील खालील प्रमाणे आहे:-

S.No.

Rly

MSPC

HSP

Total

1

CR

24

2

26

2

ECR

10

8

18

3

ER

64

4

68

4

NCR

16

0

16

5

NER

32

6

38

6

NFR

28

0

28

7

NR

158

0

158

8

NWR

32

2

34

9

SCR

20

64

84

10

SECR

16

0

16

11

SER

44

16

60

12

SR

66

4

70

13

WCR

28

0

28

14

WR

14

2

16

 Total

552

108

660

 

M.Chopade/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728389) Visitor Counter : 160