सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
थावरचंद गहलोत उद्या 7 राष्ट्रीय संस्था आणि 7 संयुक्त प्रादेशिक केंद्रांमधील 14 क्रॉस डिसएबिलिटी अर्ली इंटरव्हेंशन सेंटर्सचे उद्घाटन करणार
Posted On:
16 JUN 2021 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2021
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री थावरचंद गहलोत 17.06.2021रोजी सकाळी 11:00 वाजता , भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागा (डीईपीडब्ल्यूडी) अंतर्गत 7 राष्ट्रीय संस्था आणि 7 संयुक्त प्रादेशिक केंद्रांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या 14 क्रॉस डिसएबिलिटी अर्ली इंटरव्हेंशन सेंटर्सचे आभासी मंचावरून उदघाटन करतील.
दिव्यांग असलेल्या मुलांसाठी (0-6 वर्षे) सुरुवातीलाच क्रॉस डिसएबिलिटी अर्ली इंटरव्हेंशन प्रदान करण्याची आवश्यकता ओळखून जोखीम असलेल्या किंवा विलंबाने प्रगती होत असलेल्यांसाठी डीईपीडब्ल्यूडीने मुंबईसह पहिल्या टप्प्यात 7 राष्ट्रीय संस्थांमध्ये प्रायोगिक तत्वावर 14 क्रॉस डिसएबिलिटी अर्ली इंटरव्हेंशन सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रसारण webcast.gov.in/msje या वेबलिंकवर वर उपलब्ध असेल .
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727761)