सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

हजारो ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करत आहे, एल्डरलाइन टोल फ्री क्रमांक (14567) – रतन लाल कटारिया

Posted On: 16 JUN 2021 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जून 2021

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रतन लाल कटारिया म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांसाठी लसीकरणाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, सरकारने त्यांच्यासाठी `नियर होम` (घराजवळ) लसीकरण केंद्रे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जागरुकता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते संबोधित करीत होते.

कटारिया यांनी पुढे एल्डरलाइन प्रकल्पांतर्गत प्रमुख राज्यांमध्ये नुकत्याच राज्यांनुसार सुरू केलेल्या कॉल सेंटरच्या (टोल फ्री क्रमांक – 14567) यशावर प्रकाश टाकला. कोविड महामारीच्या काळात ही हेल्पलाइन विलक्षण कार्य करीत आहे. उदा. कसगंज जिल्ह्यात, ७० वर्षांच्या उपाशी, निराधार, ज्येष्ठ महिलेला या हेल्पलाइनच्या माध्यमातून वृद्धाश्रम उपलब्ध करून देण्यात आले. `एल्डरलाइन`ने ७० वर्षांच्या माजी सैनिकाला मदत केली, जे आपल्या घरी पोहोचण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून चांदौसी बस स्थानकात अडकून राहिले होते. `एल्डरलाइन` हे हजारे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करीत आहे, मंत्र्यांनी सांगितले.


* * *

M.Chopade/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1727715) Visitor Counter : 174