ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खाद्यतेलांच्या किंमती कमी होण्यास सुरुवात झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा
खाद्यतेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय किंमती आणि देशांतर्गत उत्पादन यासह इतर घटकांवर अवलंबून
देशांतर्गत वापर आणि उत्पादन यांच्यातील दरी जास्त असल्याने भारताकडून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात
Posted On:
16 JUN 2021 8:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2021
भारतातील खाद्यतेलाच्या किंमती कमी होत असल्याचा कल दर्शवित आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्याभरानंतर आता खाद्यतेलांच्या किंमती खाली येत आहेत. मुंबईतल्या किंमतींनुसार काही खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये सुमारे 20% घट झाली आहे.
7 मे रोजी ‘21 रोजी पाम तेलाची किंमत 142 रुपये प्रति किलो होती, आता ती 115 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाली आहे , 19% ची घसरण.
5 मे ‘21रोजी सूर्यफूल तेलाची किंमत 188 रुपये प्रतिकिलो होती, आता ती 157 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाली आहे, 16 % ची घसरण.
20 मे ‘21 रोजी सोया तेलाची किंमत 162 रुपये प्रतिकिलो होती आता ती मुंबईत 138 रुपये प्रतिकिलो पर्यंत कमी झाली आहे, 15 % ची घसरण.
मोहरीच्या तेलाच्या बाबतीत, 16 मे ‘21 रोजी या तेलाची किंमत प्रति किलो 175 रुपये होती आता ती कमी होऊन 157 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाली आहे, सुमारे 10% घसरण.
14 मे ‘21रोजी शेंगदाणा तेलाची किंमत प्रति किलो 190 रुपये होती तर आता ती कमी होऊन 174 रुपये प्रतिकिलोवर झाली आहे, 8 % ची घसरण.
2 मे‘21 रोजी वनास्पती तेलाची किंमत प्रति किलो 154 रुपये होती, आता ती 141 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाली आहे, 8 % ची घसरण.
हे लक्षात घ्यावे लागेल की, खाद्यतेलाच्या किंमती समन्वित घटकांवर अवलंबून असतात ज्यात आंतरराष्ट्रीय किंमती, देशांतर्गत उत्पादन यांचादेखील समावेश असतो.देशांतर्गत वापर आणि उत्पादन यांच्यातील दरी जास्त असल्याने भारताला खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत आहे.हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टीने सरकार मध्यम आणि दीर्घकालीन अनेक उपाययोजना करण्याच्या दिशेने कार्यरत आहे.
या उपायोजमनांमुळे भारतात अन्न शिजवण्यासाठी मुख्य घटक असलेल्या खाद्यतेलाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727687)
Visitor Counter : 221