वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जळगाव इथली जीआय प्रमाणित केळी दुबईला निर्यात करण्यात आली


2020-21 मध्ये भारताने 619 कोटी रुपयांची 1.91 लाख टन केळी निर्यात केली

Posted On: 16 JUN 2021 11:22AM by PIB Mumbai

भौगोलिक सांकेतांक  (जीआय) प्रमाणित कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना देत  तंतुमय पदार्थ आणि खनिजानी समृद्ध जळगाव इथली जीआय प्रमाणित केळी’ ची खेप  दुबईला निर्यात करण्यात आली आहे.

जीआय प्रमाणित बावीस मेट्रिक टन जळगाव केळी  महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचा भाग असलेल्या तांदळवाडी गावच्या प्रगतिशील शेतकर्‍यांकडून घेण्यात आली.

 2016 मध्येजळगाव केळीला जीआय प्रमाणीकरण  मिळाले ज्याची  निसर्गराजा कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके) जळगाव येथे नोंदणी झाली.  जागतिक दर्जाच्या कृषी  पद्धतींचा अवलंब केल्यामुळे भारताची केळी निर्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

भारताच्या केळीची निर्यात 2018-19 मधील 413 कोटी रुपये मूल्य असलेल्या 1.34 लाख मेट्रिक टन वरून वाढून 2019-20 मध्ये 660  कोटी रुपये मूल्य आणि 1.95 लाख मेट्रिक टन पर्यंत वाढली आहे.   2020-21  (एप्रिल-फेब्रुवारी) दरम्यान भारताने  1.91 लाख टन केळी  निर्यात केली असून त्याचे मूल्य  619 कोटी रुपये  आहे.

केळीच्या उत्पादनात जगात भारत  आघाडीवर असून एकूण उत्पादनात भारताचा सुमारे 25% वाटा आहे. केळीच्या उत्पादनात आंध्र प्रदेशगुजराततामिळनाडूमहाराष्ट्रकेरळउत्तर प्रदेशबिहार आणि मध्य प्रदेश यांचा 70% पेक्षा अधिक वाटा आहे.

पायाभूत सुविधा विकासगुणवत्ता विकास आणि बाजारपेठ  विकास यासारख्या योजनांच्या विविध घटकांतर्गत निर्यातदारांना सहाय्य पुरवून एपीईडीए (APEDA ) कृषी व प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते. याव्यतिरिक्तएपीईडीए आंतरराष्ट्रीय ग्राहक-  विक्रेता बैठक,  कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयातदार देशांबरोबर आभासी व्यापार मेळावे देखील आयोजित करते.

 या व्यतिरिक्त वाणिज्य विभाग  निर्यात योजनेसाठी व्यापार सुविधा बाजारपेठ प्रवेश इत्यादीसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून निर्यातीला मदत करत आहे.

***

Jaidevi PS/DY

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1727475) Visitor Counter : 236