भारतीय निवडणूक आयोग

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची आभासी परिषद आयोजित केली


मतदार केंद्रित सेवा जलद आणि कार्यक्षमतेने पुरवण्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला भर

परिषदेदरम्यान सार्वत्रिक निवडणुका 2019-ऍटलस प्रकाशित करण्यात आला

Posted On: 15 JUN 2021 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2021

केंद्रीय  निवडणूक आयोगाने आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची आभासी परिषद आयोजित केली. या परिषदेत  सुरळीत , कार्यक्षम व मतदार स्नेही  सेवा, मतदारयादीचे अद्ययावतीकरण / सत्यता , माहिती तंत्रज्ञान ऍप्लिकेशनचे एकात्मीकरण , व्यापक मतदार संपर्क  कार्यक्रम, माध्यम व दळणवळण धोरण , खर्चावर देखरेख, कायदेशीर मुद्दे, ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी साठवणूक संबंधी  पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती यासारख्या प्रमुख विषयांवर प्रामुख्याने भर देण्यात आला.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त  सुशील चंद्रा यांनी बॅक-एंड सिस्टम सुधारण्यासाठी अशा  आढावा बैठकींचे महत्त्व अधोरेखित केले, जेणेकरुन मतदार केंद्रित सेवा जलद, कार्यक्षमतेने आणि प्राधान्याने पुरवता येतील. सुशील चंद्र यांनी विद्यमान मतदारांसाठी नोंदणी आणि इतर सेवा जसे दुरुस्ती, पत्ता बदलणे यासारख्या  सेवांसाठी  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवीन मतदारांना सहभागी करून वर्षभर प्रयत्न  केले पाहिजेत आणि निवडणूक आयोगाच्या सुलभ सुविधा मंचाबाबत जनजागृती करावी यावर भर दिला.

निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांनी आपल्या संबोधनात सांगितले  की नुकत्याच मतदान झालेल्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिका-यांनी अनुपस्थित मतदारांसाठी मोबाईल अ‍ॅप्स, गुन्हेगारांची पार्श्वभूमी आणि मतदान / पोलिस कर्मचार्‍यांचे यादृच्छिकरण यासारख्या यशस्वी सर्वोत्तम पद्धतींची व्याप्ती वाढवणे / एकत्रित करण्याचे मार्ग सुचवावेत.

निवडणूक आयुक्त  अनुप चंद्र पांडे यांनी रचनात्मक सूचनांसाठी सीईओंचे कौतुक केले. ते म्हणाले की, निवडणूक नसतानाच्या कालावधीचा उपयोग सीईओंनी मनुष्यबळ संसाधने आणि पायाभूत सुविधांची टंचाई दूर करण्यासाठी  केला पाहिजे.

आयोगाचे सरचिटणीस  उमेश सिन्हा यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना  आठवण करून दिली की, निवडणूक नसतानाच्या  काळात, मतदार आणि भावी मतदारांना मतदार साक्षरता मंडळामार्फत संपर्क मोहिमेत सहभागी करून घ्यावे आणि इतर एसव्हीईईपी उपाययोजना प्राधान्यक्रमाने हाती घ्याव्यात जेणेकरून मुख्य निवडणूक अधिकारी आगामी निवडणुकासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज राहतील.

आयोगाने आज आढावा बैठकीत ‘सार्वत्रिक निवडणुका  2019’ संबंधी  अ‍ॅटलासचे  ई-प्रकाशन देखील केले. यामध्ये  या कार्यक्रमाची सर्व माहिती   आणि सांख्यिकीय आकडेवारी समाविष्ट आहे. या ऍटलसमध्ये  42  विषयासंबंधी नकाशे आणि निवडणुकांचे विविध पैलू दर्शविणारे   90 तक्ते देखील आहेत. ई-ऍटलस https://eci.gov.in/ebooks/eci-atlas/index.html वर उपलब्ध आहे. कोणत्याही सूचना असल्यास आयोगाच्या ईडीएमडी विभागाबरोबर सामायिक करता येतील.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1727357) Visitor Counter : 224