वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पीएलआय योजनेबाबत पीयूष  गोयल यांनी उद्योग क्षेत्राशी साधला संवाद


योजनेअंतर्गत पात्र कंपन्यांची निवड पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने केली जाईल - गोयल

Posted On: 14 JUN 2021 9:27PM by PIB Mumbai

 

केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी आज उद्योग जगताशी घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या (एसी आणि एलईडी)  उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेबाबत (पीएलआय) संवाद साधला. या योजनेबाबतचा अभिप्राय घेण्यासाठी हा संवाद साधण्यात आला, यासाठी अर्ज करण्याची मुदत उद्यापासून 3 महिन्यांसाठी सुरू राहणार आहे.

अर्थसंकल्प 2021 – 22 मध्ये प्रमुख 13 क्षेत्रांतील पीएलआय योजनांसाठी 1.97 लाख कोटी जाहीर करण्यात आले होते. पीएलआयच्या माध्यमातून 5 वर्षांत 500 अब्ज अमेरिकन डॉलर उत्पादन अपेक्षित होते. केवळ पीएलआय योजना गेल्या 5 वर्षांच्या एकूण उत्पादनापैकी ¼ विस्तार करू शकते. या योजनेतून 5 वर्षात कमीत कमी 1 कोटी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील पीआयएल योजना 16 एप्रिल 2021 रोजी अधिसूचित केली गेली. भारतात घरगुती वापरातील इलेक्ट्रोनिक वस्तूंवरील उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या मार्गदर्शक सूची 4 जून 2021 रोजी जारी करण्यात आल्या. 2021 – 22 ते 2028 – 29 पर्यंत या योजनेचा खर्च रुपये 6,238 कोटी इतका आहे. हे  5 वर्षांच्या वाढीव विक्रीवर 4 % ते 6 % प्रोत्साहन देते.

उद्योग क्षेत्रातील प्रमुखांना संबोधित करताना, गोयल म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी उत्पादक घडविण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे. ते म्हणाले, भारताच्या विकास गाथेचे नेतृत्त्व त्याच्या प्रमुख पीएलाय योजनेद्वारे केले जाईल. हे मूल्य स्पर्धात्मक, गुणवत्ता, कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान निर्माण करेल. `आत्मनिर्भरता` साध्य करण्यासाठी हा भारताचा स्प्रिंगबोर्ड आहे. मंत्री म्हणाले की, पीएलआयच्या माध्यमातून, जागतिक पुरवठा साखळीमध्ये आपला हक्क सांगण्यासाठी भारत आपली स्पर्धात्मक आणि तुलनात्मक क्षमता वापरेल.  क्षमता आणि कर्तृत्त्व निर्माण करण्यासाठी ही योजना भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देईल. गोयल म्हणाले की या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या कंपन्यांची निवड पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने केली जाईल.

***

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1727066) Visitor Counter : 176