संरक्षण मंत्रालय

आयडीईएक्स-डीआयओच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषासाठी 498.8 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय सहाय्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

Posted On: 13 JUN 2021 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जून 2021

 

आगामी पाच वर्षांसाठी संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषासाठी, संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवोन्मेष ( (iDEX)- संरक्षण नवोन्मेष संघटना (डीआयओ) च्या माध्यमातून 498.8 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय सहाय्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली. देशाच्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्राचे स्वावलंबन आणि स्वदेशीकरण हे आयडीईएक्स-डीआयओचे प्राथमिक उद्दीष्ट आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पीय सहाय्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत अभियाना’ ला मोठी चालना मिळेल.

एमएसएमई, स्टार्ट-अप्स, वैयक्तिक नवोन्मेषी, संशोधन  आणि विकास संस्था आणि शिक्षण क्षेत्रासह उद्योगांना सहभागी करून आणि अंतराळ क्षेत्रात नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी एक परिस्थितीक व्यवस्था तयार करणे आणि त्यांना अनुदान/ निधी आणि अन्य पाठबळ देणे हे संरक्षण उत्पादन विभाग (डीडीपी) द्वारे आयडीएक्सची रचना करण्याचा  आणि डीआयओची स्थापना करण्याचा उद्देश आहे. यामध्ये भविष्यात भारतीय संरक्षण आणि अंतराळ क्षेत्राच्या आवश्यकतांसाठी अवलंब करण्याची चांगली क्षमता आहे.

आगामी पाच वर्षांसाठी, डीआयओ रचनेअंतर्गत  सुमारे 300 स्टार्ट-अप्स/ एमएसएमई/ वैयक्तिक नवोन्मेषी आणि 20 भागीदार इनक्यूबेटरना आर्थिक सहाय्य देणे हा  498.8 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय सहाय्य योजनेचा उद्देश आहे. ही योजना संरक्षण गरजांबद्दल भारतीय नवोन्मेष क्षेत्रात जागरूकता वाढविण्यासाठी आणि याउलट भारतीय संरक्षण आस्थापनामध्ये त्यांच्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अनोखे उपाय सुचविण्याच्या त्यांच्या क्षमतेप्रती जागरूकता वाढविण्यासाठी मदत करेल.

डीआयओ आपल्या कार्यसंघासह, भारतीय संरक्षण उत्पादन उद्योगांशी जोडण्यासाठी आणि संवाद साधण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण माध्यम तयार करण्यासाठी सक्षम होईल. या कार्यसंघाला जाणवलेले दीर्घकालीन परिणाम म्हणजे एक संस्कृती स्थापन करणे, जिथे भारतीय सैन्य दलाच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांना सूचीबद्ध करणे ही एक सामान्य आणि वारंवार होणारी गोष्ट आहे आहे.

कमी कालावधीत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने, भारतीय संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासाठी नव्या, स्वदेशी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वेगाने विकास सुलभ करणे, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासाठी  सह-निर्मितीला  प्रोत्साहित करण्यासाठी नाविन्यपूर्ण स्टार्ट-अपसोबत संबंध प्रस्थापित करण्याची संस्कृती तयार करणे; संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रामध्ये  तंत्रज्ञान सह-निर्मिती आणि सह-नवोन्मेष संस्कृतीला सक्षम करणे आणि अंतराळ क्षेत्र  आणि स्टार्ट-अप्समध्ये नवोन्मेषला चालना देऊन परिस्थितीक व्यवस्थेचा भाग होण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

 

* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1726805) Visitor Counter : 249