इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

शेतकऱ्यांना मागणीवर आधारित टेली कृषी सल्ला पुरवण्यासाठीच्या सामंजस्य करारावर डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या स्वाक्षऱ्या

Posted On: 09 JUN 2021 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2021

शेतकऱ्यांना स्थान निहाय, मागणीवर आधारित टेली कृषी सल्ला पुरवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद  आणि इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांनी 9 जून  2021 ला नवी दिल्लीतल्या कृषी भवन इथे सामंजस्य करारावर  स्वाक्षऱ्या केल्या.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचा सध्याचा इंटर क्टीव्ह इन्फोर्मेशन डीसेमिनेशन सिस्टीम (आयआयडीएस) मंच, आयसीएआरच्या प्रस्तावित किसान सारथी कार्यक्रमाबरोबर एकीकृत करण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. देशातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आयसीएआरच्या जाळ्यामार्फत याची अंमलबजावणी करण्याचाही याचा उद्देश आहे. स्थानिक स्तरावर विविध कृषी विषयक  बाबींना सहाय्य करण्यासाठी मल्टीमिडिया, बहुविध सल्ला आणि संवाद प्रणाली उभारण्यासाठी, आयसीटी मंच विकसित आणि उपयोगात आणण्यासाठी सहकार्य करण्याबाबत भारतीय कृषी संशोधन परिषद आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन यांच्यात सहमती झाली आहे.

सुरवातीला भारतीय कृषी संशोधन परिषदेत आयआयडीएस द्वारे शेतकऱ्यांकडून मोबाईल फोनचा वापर करत कृषी विषयक माहिती गोळा करता येईल. शेतकऱ्यांनी ज्याची मागणी केली आहे अशी वैयक्तिक आवश्यकतांवर आधारित माहिती प्राप्त करण्याचा पर्याय आयआयडीएस देईल. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करताना तज्ञांना शेतकऱ्याचा डाटाबेस पाहणे शक्य राहील. अशा पद्धतीने तज्ञांना शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्या उत्तम पद्धतीने (केवायएफ- आपल्या शेतकऱ्याला जाणून घ्या) जाणून घेण्यासाठी आणि जलद गतीने त्याचे निराकरण करण्यासाठी तोडगा सुचवण्यासाठी मदत होणार आहे.सध्या आयआयडीएस मंच ईशान्येकडील राज्ये, आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये कार्यरत असून आयसीएआर समवेत झालेल्या सामंजस्य करारामुळे संपूर्ण देशभरात त्याचा विस्तार होणार आहे.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1725736) Visitor Counter : 231