भारतीय निवडणूक आयोग

अनुप चंद्र पांडे यांनी नवे निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला

Posted On: 09 JUN 2021 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2021

अनुप चंद्र पांडे यांनी आज भारताचे नवीन निवडणूक आयुक्त  म्हणून कार्यभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त  सुशील चंद्र आणि निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखालील  तीन सदस्यीय समितीत दुसरे निवडणूक आयुक्त म्हणून भारतीय निवडणूक आयोगात  सामील झाले.

15 फेब्रुवारी 1959 रोजी जन्मलेले अनुप चंद्र पांडे हे 1984 च्या तुकडीतील  भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी  आहेत. केंद्र  सरकारच्या सेवेतील सुमारे  37 वर्षांच्या कार्यकाळात  पांडे यांनी केंद्र सरकारची  विविध मंत्रालये आणि विभाग तसेच उत्तर प्रदेशमधील आपल्या राज्य केडर मध्ये  काम केले आहे.

अनुप चंद्र पांडे, यांनी  पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि पंजाब विद्यापीठातून मटेरियल मॅनेजमेन्ट मध्ये मास्टर्स  पदवी मिळवली  आहे. इतिहासाच्या अभ्यासाची आवड असणार्‍या अनुप चंद्र यांनी मगध विद्यापीठातून प्राचीन भारतीय इतिहासात तत्त्वज्ञानाची डॉक्टरेट मिळवली.

पांडे ऑगस्ट 2019 मध्ये उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिव म्हणून  सेवानिवृत्त झाले.  निवडणूक आयोगात सामील होण्यापूर्वी  पांडे यांनी उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या देखरेख समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1725712) Visitor Counter : 329