रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्स्प्रेसने 26,281 मेट्रिक टन पेक्षा अधिक द्रव रूपातील ऑक्सिजन देशभरात केला वितरित

Posted On: 06 JUN 2021 4:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2021

देशभरात 26000 मेट्रिक टन द्रव रूपातील ऑक्सिजन वितरित करण्याचा टप्पा ऑक्सिजन एक्स्प्रेसने ओलांडला आहे.

यापूर्वी, भारतीय रेल्वेने 26281 मेट्रिक टन पेक्षा अधिक द्रव रूपातील ऑक्सिजन 1534 टँकर्सच्या माध्यमातून देशभरात विविध राज्यांमध्ये वितरित केला होता.

एक बाब उल्लेखनीय आहे की ऑक्सिजन एक्स्प्रेसने 43 दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 126 मेट्रिक टन वितरण करून काम सुरु केले.

हे पत्रक जारी होईपर्यंत, 614 मेट्रिक टन द्रवरूपातील ऑक्सिजन महाराष्ट्रात उतरविण्यात आला आहे.

या संकटकाळात लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या मालगाड्यांचा सरासरी वेग 55 च्या पुढे आहे. उच्च प्राधान्य असलेल्या ग्रीन कॉरिडॉरमध्ये आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन विविध भागांतील ऑपरेशनल टीम सर्वात वेगवान वेळेत ऑक्सिजन वितरित करण्यासाठी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत काम करीत आहे. विविध ठिकाणी कर्मचारी बदलण्यासाठी तांत्रिक थांबे 1 मिनिटांपर्यंत कमी करण्यात आले. रेल्वे मार्ग खुले ठेवण्यात आले आहेत आणि ऑक्सिजन एक्स्प्रेस वेळेवर पोहोचावी यासाठी उच्च सतर्कता बाळगली जात आहे.

हे सर्व अशा प्रकारे केले जात आहे की, इतर मालवाहतूक गाड्यांच्या दळणवळणाची गती देखील कमी होणार नाही.

 

 

M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1724939) Visitor Counter : 265