आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड लसीकरणाबाबतच्या गैरसमजाचे निराकरण


राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहिमेत जानेवारी ते एप्रिल 2021 पर्यंत खासगी रुग्णालयासाठी थेट खरेदीची तरतूद नव्हती

1 मे 2021 पासून राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांकडून थेट खरेदीसाठी 50% मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या

1 मे 2021 रोजी सुरू केलेल्या धोरणाशी 16 जानेवारी 2021 च्या आकडेवारीची तुलना करणे अयोग्य आणि दिशाभूल करणारे आहे

Posted On: 04 JUN 2021 11:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2021

 

केंद्र  सरकार सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने  16 जानेवारी 2021 पासून जगातील सर्वात मोठी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालवत  आहे.

काही माध्यमांच्या अहवालात  म्हटले आहे की ‘25% मात्रा  खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, मात्र लसीकरणात त्याचे प्रमाण एकूण मात्रांच्या केवळ 7.5% आहे’. हे अहवाल अचूक नाहीत आणि उपलब्ध आकडेवारीशी  जुळत नाहीत. खाजगी क्षेत्रात लसीच्या मात्रांचे  वाटप आणि लसीकरणात असमतोल असल्याचे दाखवण्यासाठी ते जाणूनबुजून दोन अ -तुलनात्मक डेटा पॉइंट्सची तुलना करत आहेत.

1 मे 2021 रोजी ‘उदार आणि वेगवान राष्ट्रीय कोविड19 लसीकरण धोरण ’ स्वीकारण्यात आले. जे  सध्याच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला मार्गदर्शन करत आहे. या धोरणानुसार, प्रत्येक महिन्यात एकूण केंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या (सीडीएल) मान्यताप्राप्त  कोणत्याही उत्पादकाच्या लसीच्या मात्रांपैकी 50% मात्रा  सरकारकडून खरेदी केल्या जातील.  यापुढेही या मात्रा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येतील. उर्वरित 50 टक्के मात्रा  राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार आणि खासगी रुग्णालयांना  थेट खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या धोरणाचे उद्दीष्ट लस उत्पादकांना लसींच्या  उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि नवीन उत्पादकांना आकर्षित करणे हे आहे. यामुळे लसींचे उत्पादन वाढून  लसींची किंमत, खरेदी आणि लसीकरणात लवचिकता येईल आणि मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल. . देशभरात सेवांची  सुलभता वाढवण्याच्या दृष्टीने  देखील हे केले आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय कोविड -19 लसीकरण मोहीम  यशस्वी करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर एकत्र काम करत आहे. या संदर्भात, सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशांना खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडे ऑर्डर देऊन प्रोत्साहित करण्यासाठी नियमितपणे  संवाद साधला जात आहे. सर्व खासगी रुग्णालये आणि प्रशिक्षित कर्मचार्‍यांचे जाळे वापरण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेच्या यशात हातभार लावण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ते यापूर्वीच कळवण्यात आले आहे.

मे 2021 महिन्यात, उदार  धोरण लागू केल्यापासून, लसीकरणासाठी एकूण 7.4 कोटी मात्रा उपलब्ध होत्या. त्यातील , 1.85 कोटी मात्रा  खासगी रुग्णालयांसाठी खरेदीसाठी राखीव ठेवल्या  आहेत. खासगी रुग्णालये मे 2021 महिन्यात 1.29  कोटी मात्रा खरेदी करू शकल्या आहेत.  त्यापैकी त्यांनी 22 लाख मात्रा दिल्या आहेत.  17% पेक्षा जास्त अद्याप रुग्णालयांना प्राप्त झाल्या आहेत.

हे देखील नमूद केले जात आहे  की, खाजगी रुग्णालयांना बहुतांश पुरवठा  मे महिन्याच्या उत्तरार्धात झाला.  मेच्या मध्याला लसींचा पुरवठा झाल्याने खासगी रुग्णालयांद्वारे दिल्या जाणाऱ्या  लसींचा कल वाढल्याचे खाली दिलेल्या तक्त्यात दिसून येते.

1 मे 2021 पासून उदार धोरण राबवण्यास सुरुवात झाल्यापासून खासगी क्षेत्राला खरेदी, रसद व पुरवठा व्यवस्थापनाच्या प्रक्रियेतून जावे लागले. त्यामुळे खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून लसींच्या मात्राची  खरेदी सुलभ करण्यासाठी थोडा वेळ लागणे साहजिक आहे. . उदार  धोरणाआधी जेव्हा केंद्र  सरकार खाजगी क्षेत्राना लस पुरवत होते  तेव्हा ते  दररोज 2 ते अडीच लाखांपेक्षा जास्त मात्रा देऊ शकत होते.

आता लॉजिस्टिक सुरळीत झाले आहे आणि अनेक  खाजगी रुग्णालयांना मात्रा मिळायला सुरुवात झाली आहे.  मे, 2021 च्या तिसर्‍या आठवड्यात लसीच्या मात्रांच्या पुरवठ्यात मोठी वाढ झाल्याचे तक्ता  दर्शवतो. हा कल सुरू राहिला  आणि  3 जून 2021 रोजी खासगी रुग्णालयांद्वारे 4 लाखांहून अधिक मात्रा दिल्या गेल्या.


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724595) Visitor Counter : 188