पंचायती राज मंत्रालय

नरेंद्रसिंह तोमर यांनी आदर्श ग्रामपंचायत नागरिक सनद केली जाहीर


29 क्षेत्रामध्ये सेवा पुरविण्यासाठी आदर्श ग्रामपंचायत नागरिक सनद

Posted On: 04 JUN 2021 8:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2021

 

राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि  पंचायती राज (एनआयआरडीपीआर) संस्थेच्या सहकार्याने पंचायती राज मंत्रालयाने (एमआरपीआर) स्थानिकीकृत शाश्वत विकास उद्दिष्टांसह कृती संरेखित करून 29 क्षेत्रांतील सेवा पुरवण्याच्या दृष्टीने, एक आदर्श ग्रामपंचायत नागरिक आराखडा, श्री. नरेंद्र सिंह तोमर यांनी आज एका आभासी कार्यक्रमाद्वारे जाहीर केला. ही सनद, सेवांची रचना  आणि वितरण करताना शाश्वत विकासाच्या दृष्टीने सार्वजनिक सेवा पुरविणे सुनिश्चित करेल आणि विविध दृष्टिकोनांना संकलित करून नागरिकांचा सेवा अनुभव  सुखद करेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी वाढवेल.

लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्वाची कामे ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहेत यावर भर देत कोविड-19 च्या अभूतपूर्व महामारीच्या काळात  प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. असे केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. लोकांच्या तक्रारींचे निवारण आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी वेळोवेळी सेवा प्रदान करणे हे नागरिकांची सनद जाहीर करण्यामागील उद्दिष्ट आहे. यामुळे एकीकडे नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यास आणि दुसरीकडे पंचायत आणि त्यांचे निवडलेले प्रतिनिधी थेट जनतेला उत्तरदायी ठरविण्यासाठी यामुळे मदत मिळेल.  ग्रामपंचायतींनी या आराखड्याचा  उपयोग नागरिकांची सनद तयार करण्यासाठी करावा  आणि ग्रामसभेच्या  ठरावाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2021 पर्यंत ही सनद अंगीकारावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार राज्यांनी  कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे.

पंचायतराज मंत्रालयाच्या सचिवांनी यावेळी सांगितले की, कोणताही  पूर्वग्रह न ठेवता आणि नागरिकांच्या अपेक्षांच्या अनुषंगाने सेवांची गुणवत्ता सुधारणे आणि सार्वजनिक सेवेच्या संदर्भात नागरिकांना सक्षम बनविणे हे आदर्श ग्रामपंचायत नागरिक सनद जाहीर करण्याचे मूळ उद्दिष्ट आहे.

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724515) Visitor Counter : 236