सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
भारतातील वृद्धांच्या मदतीसाठी थावरचंद गहलोत यांच्या हस्ते 'सेज '(सीनियरकेअर एजिंग ग्रोथ इंजिन) उपक्रमाचा आणि 'सेज' पोर्टलचा प्रारंभ
Posted On:
04 JUN 2021 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2021
वृद्धांच्या मदतीसाठीच्या 'सेज' (सीनियरकेअर एजिंग ग्रोथ इंजिन) उपक्रमाचा आणि 'सेज' पोर्टलचा प्रारंभ केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री रामदास आठवले आणि श्री रतनलाल कटारिया यांच्या उपस्थितीत आज आभासी माध्यमातून झाला.सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री आर. सुब्रह्मण्यम यांनी यावेळी प्रास्ताविक केले.
विश्वसनीय स्टार्ट-अपद्वारे वृद्धांची काळजी घेणारी उत्पादने आणि सेवांची “एकाच ठिकाणी उपलब्धता ” निर्माण करण्यासाठी सेज पोर्टल पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलचे कार्यान्वयन 5 जून 2021 पासून सुरु झाल्यानंतर अर्ज स्वीकारले जातील. आरोग्य, गृहनिर्माण, देखभाल केंद्र, याशिवाय वित्त, अन्न आणि संपत्ती व्यवस्थापन आणि कायदेशीर मार्गदर्शन यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित तांत्रिक उपलब्धता प्रदान करण्यास सक्षम असणाऱ्या स्टार्ट-अपची निवड नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांच्या आधारे केली जाईल.
गहलोत यांनी बोलताना सांगितले की, आपल्या देशात वृद्धांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे हे लक्षात घेऊन वृद्धांनी आनंदी, निरोगी आणि आर्थिक तसेच शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे, यासाठी 2016 मध्ये एक ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी सुरू करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित सेवा कार्यक्रमांना पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने हे सीनियरकेअर एजिंग ग्रोथ इंजिन (सेज) पोर्टल आज सुरू करण्यात आले आहे. वृद्धांना सेवा देण्याच्या क्षेत्रातील उद्योगांमध्ये रस असणाऱ्या लोकांना मदतीच्या दृष्टीकोनातून 'सेज' उपक्रमाचा आणि 'सेज' पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला, असे गहलोत यांनी सांगितले.
Pl click here for ppt on SAGE
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724477)
Visitor Counter : 296