संरक्षण मंत्रालय
रिअर अॅडमिरल कपिल मोहन धीर यांची सहसचिव पदी (नौदल आणि संरक्षण कर्मचारी) नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2021 11:32AM by PIB Mumbai
रियर अॅडमिरल कपिल मोहन धीर यांनी सैन्य व्यवहार विभागात संयुक्त सचिव (नौदल आणि संरक्षण कर्मचारी) पदाचा कार्यभार स्वीकारला. या पदावर नियुक्ती मिळालेले ते पहिले सशस्त्र दल अधिकारी आहेत. पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे ते माजी विद्यार्थी आहेत आणि 01 जानेवारी 1985 रोजी भारतीय नौदलात त्यांची नियुक्ती झाली होती.
ते सर्वात वरिष्ठ सर्व्हिंग मरीन कमांडो (मार्कोस) आहेत. आणि त्यांनी प्रीमियर मार्कोस आस्थापना कमांड, आयएनएस अभिमन्यु, भारतीय नौदल युद्धनौका आयएनएस खंजर आणि आयएनएस राणा आणि “ओपी पवन” आणि “ओपी ज्युपिटर” यासह देशांतर्गत आणि परदेशातील शांतता मोहीमा यासह किनारपट्टीभागात अग्रभागी राहून काम केले आहे. त्यांनी महत्वाच्या कार्यान्वयन आणि कर्मचारी विभागात काम केले आहे.
ज्यात नौदलाच्या पूर्व विभागातील ताफा कार्यान्वयन अधिकारी आणि वर्क अप प्रभारी कमोडोर, भारतीय नौदल वर्कअप टीम (आयएनडब्ल्यूटी), कोची यांचा समावेश आहे.
नौदल मुख्यालय तसेच एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयात विविध क्षमतांमध्ये काम केलेल्या या अधिकाऱ्यांना संरक्षण मंत्रालयाचा समृद्ध अनुभव आहे. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे पदवीधर आहेत.
विशिष्ट सेवेसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ प्राप्त झाले आहे.

***
ST/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1724373)