वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मे 2021 मध्ये भारताची चमकदार व्यापारविषयक कामगिरी
Posted On:
03 JUN 2021 3:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2021
निर्यातीच्या क्षेत्रात भारताची चमकदार कामगिरी सातत्याने सुरु असून, मे महिन्यातल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, गेल्यावर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत, यंदा भारताच्या व्यापारविषयक निर्यातीत 67.39 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. तर मे, 2019 च्या तुलनेत, ही वाढ 7.93 टक्के अधिक नोंदली गेली आहे, अशी माहिती, वाणिज्य सचिव डॉ अनुप वाधवान यांनी दिली. नवी दिल्लीत आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की भारताची व्यापारविषयक निरतात मे महिन्यात, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 45.96 टक्क्यांनी वाढली आहे.
पीओएल आणि रत्ने व दागिने वगळता, भारतातील सर्व व्यापारी वस्तूंची निर्यात मे महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 45.96 टक्क्यांपर्यंत वाढली आहे तर त्या आधीच्या म्हणजेच 2019-20. च्या तुलनेत 11.51 टक्क्यांनी वाढली आहे.
मे महिन्यात, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या व्यापारी आयातीत 68.54 टक्कांची वाढ झाली आहे. 2019 मे च्या तुलनेत, भारतात होणारी आयात - 17.47 टक्क्यांनी घटली आहे.
मे महिन्यात सेवाक्षेत्रातील अपेक्षित निर्यात, 17.85 अब्ज डॉलर्स इतकी होती . मे 2020 च्या तुलनेत ही निर्यात, 6.44 टक्के अधिक आहे. मी महिन्यात अंदाजे आयात, 9.97 अब्ज डॉलर्सची असण्याची शक्यता असून त्यात 0.30 टक्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
सेवा क्षेत्रातील अंदाजे मूल्य मे महिन्यात, 7.88 अब्ज डॉलर्स इतकी होती. याचाच अर्थ, या क्षेत्रात
निर्यात गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत 15.39 टकक्यानी वाढली आहे.
चामडे आणि चामड्याच्या वस्तू, हातमागावरील वस्त्रे/कापड तसेच मासे इत्यादीचा यात समावेश होतो.
टीप : सेवा क्षेत्राशी निगडीत ताजी आकडेवारी एप्रिल 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने जारी केली आहे. तर मे 2021 ची आकडेवारी ही अंदाजित असून रिझर्व्ह बँकेने ताजी आकडेवारी जाहीर केल्यानंतर त्यात आवश्यक ते बदल केले जातील.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724050)