PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 02 JUN 2021 6:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 2 जून 2021

 

 

  • India’s Daily New Cases stand at 1.32 lakh
  •  Less than 2 lakh Daily New Cases for 6 continuous days
  • Recovery Rate further climbs to 92.48%
  • Daily Positivity Rate at 6.57% continues trend of less than 10% positivity for 9 continuous days

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

 

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

भारतातील दैनंदिन नवीन रुणांच्या संख्येमध्ये सतत घसरण झालेली आढळून येत असून, भारतात गेल्या 24 तासात 1.32 लाख इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात दैनंदिन 1,32,788 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात सलग 6 व्या दिवशी 2 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

भारतात दैनंदिन नवीन सक्रीय रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत आहे. आज 17,93,645 सक्रीय रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात सक्रिय रूग्णसंख्येत एकूण 1,01,875 इतकी घसरण झाली, आता सक्रीय रुग्ण संख्या एकूण बाधित रुग्णांच्या 6.34% आहे.

दैनंदिन बरे झालेल्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत सलग 20 व्या दिवशी जास्त आहे. गेल्या 24 तासांत 2,31,456 जण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 98,668 हूनअधिक जण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

या महामारीची लागण झाल्यापासून संसर्ग झालेल्या लोकांपैकी 2,61,79,085 नागरीक कोविड-19 या आजारातून मुक्त झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 2,31,456 रूग्ण बरे झाले आहेत. एकूण रूग्ण बरे होण्याचा दर 92.48%,इतका आहे, जो सातत्याने वाढता कल दर्शवित आहे.

गेल्या 24 तासात एकूण 20,19, 773 चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण 35 कोटी ( 35,00,57,330) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात एकीकडे चाचण्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, तसेच साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दरात सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दर सध्या 8.21% वर आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटीचा दर कमी झाला असून तो आज 6.57% वर आहे. आता सलग 9 व्या दिवशी तो 10% पेक्षा कमी आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आज देशभरात एकूण संख्या 21.85 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 21,85,46,667 लसीच्या मात्रा 30,91,543 सत्रांद्वारे दिल्या गेल्या आहेत.

 

इतर अपडेटस्

 

महाराष्ट्र अपडेट्स :-

राज्यातील गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये कोविड आजार झालेल्या रुग्णांच्या माहितीचा आढावा घेतल्यानंतर लहान मुलांमध्ये कोविड-19 चे संक्रमण पसरण्याच्या बाबतीत कोणताही महत्त्वाचा बदल झाल्याचे दिसून आले नाही असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. या आढाव्यातून असे दिसते कि नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 1.3% मुलांना, 6 ते 11 वर्षे वयोगटातील 2.4% मुलांना, 12 ते 17 वर्षे वयोगटातील 4.1% मुलांना कोरोनाचा आजार झाला. एकुणात वय वर्षे 0 ते 17 या संपूर्ण वयोगटातील मुलांना कोरोना आजार होण्याचे प्रमाण 7.8% होते. राज्यात सद्यस्थितीला म्युकरमायकॉसिस आजाराचे सुमारे 4000 रुग्ण आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली. राज्यातील म्युकरमायकॉसिस आजाराने बाधित सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत असेही त्यांनी पुढे सांगितले. मोठ्या शहरांच्या परीसराबाहेर वास्तव्य करणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तहसील आणि जिल्हा पातळीवरील खासगी रुग्णालयांमध्ये आकारले जाणारे कोविड-19 वरील उपचारांचे दर कमी केले आहेत.

 

गोवा अपडेट्‌स:-

गोवा: गोवा राज्यात सोमवारी 903 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली, 22 रुग्णांचा बळी गेला तर 1777 जण रोगमुक्त झाले. राज्यात मंगळवारी कोविड बळींच्या संख्येत घसरण दिसून आली. गोवा राज्यात सध्या 11,867  कोविड सक्रीय रुग्ण आहेत. मंगळवारी 4009 व्यक्तींचे लसीकरण झाल्यानंतर, गोवा राज्यात देण्यात आलेल्या  एकूण लसीकरण मात्रांची संख्या 5,21,940 वर पोहोचली आहे.

FACT CHECK

 

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723907) Visitor Counter : 145