नौवहन मंत्रालय
दीनदयाल पोर्ट ट्रस्ट रुग्णालयातील ऑक्सिजन संयंत्र आणि अग्निशमन यंत्रणेचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन
संयंत्रामुळे रुग्णालयात 24x7 ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित होईल, डीपीटी कर्मचारी आणि परिसरातील लोकांसाठी उपयुक्त
Posted On:
02 JUN 2021 5:27PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदर, नौवहन व जलवाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनुसुख मांडवीय यांनी गांधीधाम (कच्छ) मधील गोपाळपुरी येथील दीनदयाल पोर्ट ट्रस्ट रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन कॉपर पाइपिंग नेटवर्कसह वैद्यकीय ऑक्सिजन जनरेटर युनिट तसेच अग्निशमन यंत्रणा आणि ऑक्सिजन सिलिंडर बँकेद्वारे ऑटोमॅटिक सोर्स चेंजओव्हर प्रणाली सारख्या संलग्न सुविधांचे व्हर्चुअल उद्घाटन केले.
या प्रसंगी बोलताना मांडवीय यांनी ऑक्सिजन संयंत्राचे काम अवघ्या 20 दिवसात पूर्ण केल्याबद्दल बंदर कर्मचारी आणि सर्व हितधारकांचे कौतुक केले. महमरीच्या काळात सर्व बंदरांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करताना मांडवीय म्हणाले की ऑक्सिजन पुरवठा सुलभ करून, कोविड -19 संबंधित मालवाहतुकीसाठी ग्रीन चॅनेल तयार करून आणि बंदर शुल्क माफ करून कोविड विरूद्ध लढ्यात बंदरे योगदान देत आहेत. बंदरे आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधा यापुढेही पुरवत राहतील असे ते म्हणाले.
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723844)
Visitor Counter : 289