श्रम आणि रोजगार मंत्रालय

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी स्तनदा मातांसाठी वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन द्यावे म्हणून केंद्रातर्फे नियमावली जारी

प्रविष्टि तिथि: 01 JUN 2021 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जून 2021

 

नोकरदारांच्या हितरक्षणासाठी विशेषतः सध्याच्या महामारीच्या कालखंडात स्तनदा मातांच्या हितार्थ अजून एक निर्णय घेत केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्तनदा मातांना वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सूचना   मातृत्व लाभ (दुरुस्ती) कायदा 2017 च्या कलम 5(5) अन्वये जारी केली आहे.

या कायद्यानुसार स्तनदा मातेचे कामाचे स्वरूप हे घरी राहून करता येण्यासारखे असेल तर तिच्या रोजगारदात्याने तिचे प्रसूती पश्चातच्या कालावधीचे लाभ कायम राखत नंतर घरून काम करण्याची  परवानगी परस्पर सहमतीने द्यावी. 


* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1723568) आगंतुक पटल : 297
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu