अर्थ मंत्रालय

2020-21 या वित्तीय वर्षासाठी भारत सरकारचा लेखा ( तात्पुरता/ लेखापरीक्षण न झालेला )

Posted On: 31 MAY 2021 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2021

2020-21 या वित्तीय वर्षासाठी भारत सरकारचा लेखा ( तात्पुरता/ लेखापरीक्षण न झालेला ) एकत्रित करण्यात आला असून अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. याची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत- 2020-21 मध्ये भारत सरकारला 16,89,720 कोटी रुपये (त्याच काळात सुधारित अंदाज  20-21 च्या एकूण प्राप्तीच्या105.50% ) प्राप्त झाले असून यामध्ये  14,24,035 कोटी रुपये कर महसूल, (निव्वळ केंद्राला ), 2,08,059 कोटी रुपये कराव्यतिरिक्त महसूल  आणि 57,626 कोटी रुपये बिगर कर्ज भांडवली प्राप्तीचा समावेश आहे. बिगर कर्ज भांडवली प्राप्तीमध्ये कर्ज वसुली  (19,729 कोटी रुपये ) आणि निर्गुंतवणूकीतून प्राप्त रक्कम (37,897कोटी रुपये ) यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या काळासाठी 5,94,997 कोटी रुपये राज्य सरकारांना  कराचा हिस्सा म्हणून हस्तांतरित करण्यात   आले आहेत. जे मागील वर्षापेक्षा 55,680 कोटींनी कमी आहेत.

भारत सरकारकडून 35,11,181 कोटी रुपयांचा व्यय झाला असून यापैकी 30,86,360 कोटी रुपये महसूल खात्यावर  तर 4,24,821 कोटी रुपये भांडवली खात्यावर झाला आहे. एकूण महसुली खर्चापैकी  6,82,079 कोटी रुपये व्याजापोटी तर 6,89,545 कोटी रुपये  प्रमुख अनुदानापोटी झाला आहे.

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723191) Visitor Counter : 101