आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड मदतीसंदर्भात अद्ययावत माहिती
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 18,040 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स; 19,085 ऑक्सिजन सिलिंडर्स; 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र; 15,256 व्हेन्टिलेटर्स/बायपॅप; रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या सुमारे 7.7 लाख कुप्या, फावीपिरावीर औषधाच्या सुमारे 12 लाख गोळ्या वितरीत/रवाना
Posted On:
29 MAY 2021 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2021
भारत सरकारला 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19 वैद्यकीय मदत सामग्री पुरवठा आणि उपकरणे यांचे आंतरराष्ट्रीय सहकार्य विविध देशांकडून/संस्थांकडून प्राप्त होत आहे. ही मदत सामग्री राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्वरेने वितरीत/रवाना करण्यात येत आहे.
27 एप्रिल 2021 ते 28 मे 2021 पर्यंत रस्ते आणि हवाई मार्गाद्वारे एकूण, 18,040 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स; 19,085 ऑक्सिजन सिलिंडर्स; 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र; 15,256 व्हेन्टिलेटर्स/बायपॅप; रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या सुमारे 7.7 लाख कुप्या, फावीपिरावीर औषधाच्या 12 लाख गोळ्या वितरीत/रवाना करण्यात आल्या आहेत.
26/28 मे 2021 रोजी तुर्की, इंडियन बिझिनेस असोसिएशन (तैवान), रोचे (स्वित्झर्लंड) आणि एली लिली यांच्याकडून प्रामुख्याने वस्तू प्राप्त झाल्या.
Consignments
|
Quantity
|
Oxygen Concentrators
|
20
|
Oxygen Concentrator Plants
|
5
|
Oxygen Cylinders
|
680
|
Tocilizumab
|
50,000
|
Baricitinib
|
20,000
|
Ventilators/Bi-PAP/CPAP
|
50
|
*कृपया लक्षात घ्या: यात तुर्कीकडून प्राप्त झालेले 680 ऑक्सिजन सिलिंडर्स समाविष्ट आहेत ज्यांना काही अनुपालन समस्या आहे, म्हणून गोदामात रोखले गेले आहेत.
या सामग्रीचे राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि संस्थांना प्रभावी त्वरित वाटप आणि सुव्यवस्थित वितरण अविरत सुरूच आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियमितपणे यावर व्यापक देखरेख ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणून अनुदान, मदत आणि देणगी स्वरूपात परदेशी कोविड मदत सामग्री प्राप्त झाल्यानंतर वाटपाच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष 26 एप्रिल, 2021 पासून कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाने 2 मे, 2021 पासून प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार केली आणि अंमलात आणली आहे.
* * *
S.Tupe/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722663)
Visitor Counter : 167