श्रम आणि रोजगार मंत्रालय
केंद्रीय क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी सुधारित किमान वेतन दर
Posted On:
21 MAY 2021 9:14PM by PIB Mumbai
देश कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत असताना, केंद्रीय क्षेत्रातील नियोजित रोजगारांच्या विविध श्रेणीतील कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे, भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अधिसूचित केलेले महागाई भत्त्याचे सुधारित दर 1.4.2021 पासून लागू होणार आहेत.
कामगार केंद्राच्या सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय-आयडब्ल्यू) च्या आधारे महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. चल महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याच्या प्रयोजनात जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीतील सरासरी सीपीआय-आयडब्ल्यूचा उपयोग करण्यात आला.
कामगार आणि रोजगार मंत्री श्री संतोष गंगवार म्हणाले, “याचा फायदा देशभरातील केंद्रीय क्षेत्रातील नियोजित रोजगारांच्या विविध श्रेणीतील सुमारे 1.50 कोटी कामगारांना होईल. चल महागाई भत्त्यातील वाढ सध्याच्या विशेषतः महामारीच्या काळात कामगारांना सहाय्य्यकारी ठरेल.''
श्री गंगवार यांनी असेही नमूद केले की, मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय ) यांच्याद्वारे यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले असून 1 एप्रिल 2021 पासून त्याची अंमलबजावणी होईल.
Rates of wages for different categories of employees
Schedule employment
|
Category of employees
|
Rate of wages including Variable Dearness Allowance Area wise per day (in Rupees)
|
A
|
B
|
C
|
Construction or maintenance of roads or runways or building operations etc.
|
Unskilled
|
645
|
539
|
431
|
Semi-Skilled/Unskilled Supervisor
|
714
|
609
|
505
|
Skilled/Clerical
|
784
|
714
|
609
|
Highly Skilled
|
853
|
784
|
714
|
Sweeping and Cleaning
|
--
|
645
|
539
|
431
|
Loading and Unloading workers
|
--
|
645
|
539
|
431
|
Watch and Ward
|
Without Arms
|
784
|
714
|
609
|
With Arms
|
853
|
784
|
714
|
Agriculture
|
Unskilled
|
411
|
375
|
372
|
|
Semi-Skilled/Unskilled Supervisor
|
449
|
413
|
379
|
|
Skilled/Clerical
|
488
|
449
|
412
|
|
Highly Skilled
|
540
|
502
|
449
|
For Mines employees
Category
|
Above Ground
|
Below Ground
|
Unskilled
|
431
|
539
|
Semi-Skilled/Unskilled Supervisor
|
539
|
645
|
Skilled/Clerical
|
645
|
752
|
Highly Skilled
|
752
|
840
|
केंद्रीय क्षेत्रात नियोजित रोजगारांसाठी ठरविलेले दर केंद्र सरकारी प्राधिकरणाअंतर्गत असलेली आस्थापने, रेल्वे प्रशासन, खाणी, तेलक्षेत्र, प्रमुख बंदरे किंवा केंद्र सरकारने स्थापन केलेली महामंडळे यांना लागू आहेत.
हे दर कंत्राटी आणि हंगामी कर्मचारी / कामगारांना देखील त्याचप्रमाणे लागू आहेत.
केंद्रीय क्षेत्रातील नियोजित रोजगारांच्या कर्मचार्यांसाठी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, देशभरातील मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) यांच्या तपासणी अधिकाऱ्यांमार्फत सुनिश्चित केली जाते.
***
M.Chopade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1720759)
Visitor Counter : 615