गृह मंत्रालय

विद्यमान एफसीआरए खातेधारकांना स्टेट बँक ऑफ इंडियाने नियुक्त केलेल्या नवी दिल्ली शाखेत “एफसीआरए खाते” उघडण्यासाठी 30.06.2021 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली

Posted On: 19 MAY 2021 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2021

केंद्रीय गृह मंत्रालयाने परदेशी देणगी (नियमन ) कायदा खातेधारकांना भारतीय स्टेट बँकेच्या नवी दिल्ली मुख्य  शाखा (एनडीएमबी) 11 संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 मध्ये 30.06.2021 पर्यंत एफएसआरए खातेउघडण्यास परवानगी दिली आहे. त्या  तारखेनंतर ते एनडीएमबीमध्ये उघडलेल्या एफसीआरए खाते व्यतिरिक्त अन्य कोणत्याही खात्यात परदेशी देणगी  मिळण्यास पात्र नसतील.

www.fcraonline.nic.in वर उपलब्ध असलेल्या एका सार्वजनिक नोटीसमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, सर्व व्यक्ती/स्वयंसेवी संस्था/संघटना ज्यांना असे खाते उघडल्यापासून किंवा 01.07.2021 जे आधी असेल त्या आधीच केंद्र सरकारकडून नोंदणीचे प्रमाणपत्र किंवा पूर्व परवानगी मिळालेली आहे , त्यांनी नोंद घ्यावी की  त्यांना  एसबीआय 11 संसद  मार्ग, नवी दिल्ली - 110001 येथे उघडलेल्या  एफसीआरए खाते व्यतिरिक्त इतर कोणत्याही खात्यात परदेशी देणगी मिळणार नाही.

विद्यमान एफसीआरए खातेधारकांना एफसीआरए, 2010 च्या सुधारित कलम 17(1) अंतर्गत एनडीएमबीमध्ये त्यांचे एफसीआरए खाते उघडण्यासाठी  31.03.2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती. सुधारित कलम 29 सप्टेंबर 2020 रोजी लागू झाले आहे. कोविड 19 परिस्थितीमुळे उद्‌भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून आणि स्वयंसेवी संस्थांकडून सुधारित एफसीआरए व्यवस्थेत  सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी मुदतवाढ  देण्यात आली आहे.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720106) Visitor Counter : 208