भारतीय स्पर्धा आयोग
येस ॲसेट मॅनेजमेण्ट (इंडिया) लिमिटेड आणि येस ट्रस्टी लिमिटेडची खरेदी, जीपीएल फायनान्स अँड इन्वेस्ट्मेन्ट्स लिमिटेडला करू देण्यास भारतीय स्पर्धा आयोगाची मान्यता
Posted On:
18 MAY 2021 9:26PM by PIB Mumbai
भारतीय स्पर्धा आयोगाने आज जीपीएल फायनान्स अँड इन्वेस्ट्मेन्ट्स लिमिटेडला येस ॲसेट मॅनेजमेण्ट (इंडिया) लिमिटेड (येस एएमसी) आणि येस ट्रस्टी लिमिटेड (येस ट्रस्टी)ची खरेदी करण्यास मान्यता दिली.
येस एएमसी आणि येस ट्रस्टीचे 100% समभाग जीपीएलने घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या खरेदीमुळे येस म्युच्युअल फंड जीपीएलला मिळणार असून जीपीएलकडेच त्याची संपूर्ण जबाबदारी हस्तांतरित होणार आहे.
ठेव न घेणारी, अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण यादीमध्ये न येणारी (नॉन-सिस्टेमिकली इम्पॉर्टन्ट- पाचशे कोटींपेक्षा कमी मालमत्ता असणारी), बिगरबँक वित्तीय संस्था म्हणून जीपीएल, भारतीय रिजर्व बँकेकडे नोंदलेली आहे. गुंतवणूक कंपनी श्रेणीत तिचा समावेश असून, प्रामुख्याने म्युच्युअल फण्डात गुंतवूणक करणे व व्हाईट ओक कॅपिटलला संदर्भ सेवा पुरविणे हे तिचे काम आहे. जीपीएल ही व्हाईट ओक समूहाचाच एक भाग आहे. व्हाईट ओक हा एक गुंतवणूक व्यवस्थापन करणारा व गुंतवणूक सल्लागार समूह असून प्रशांत खेमका यांनी त्याची स्थापना केली आहे..
येस एएमसी हा येस बँक लिमिटेड समूहाचा भाग आहे. येस म्युच्युअल फ़ंडासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी/ गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून येस एएमसी काम करते.
येस ट्रस्टी हा येस बँक लिमिटेड समूहाचा भाग आहे. येस म्युच्युअल फंडची संपूर्ण मालकी त्याकडे असून भागधारकांच्या हितासाठी ट्रस्टमध्ये तीच जबाबदारी त्याच्याकडे आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाचा तपशीलवार आदेश काही काळाने अपेक्षित आहे.
***
M.Chopade/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719771)
Visitor Counter : 152