भारतीय स्पर्धा आयोग

सीसीआयने, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड यांना अदानी कृष्णापटनम पोर्ट लिमिटेडच्या अतिरिक्त 25% भागभांडवलाचे अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला दिली मान्यता

Posted On: 18 MAY 2021 8:32PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय), अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड यांना मिळून अदानी कृष्णापटनम पोर्ट लिमिटेडच्या अतिरिक्त 25% भागभांडवलाचे  अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

या प्रस्तावित संयोजनात अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (अधिग्रहणकर्ता) द्वारे अदानी कृष्णपटणम पोर्ट लिमिटेड (लक्ष्य) च्या अतिरिक्त 25% भागभांडवलाचे अधिग्रहण  करण्याची संकल्पना मांडली  आहे.

अधिग्रहणकर्ता, ही  विविध कार्यरत बंदरे असलेली  एक खाजगी कंपनीआहे. सध्या त्यांची  गुजरात, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशा या सहा राज्यांमधील समुद्रकिनाऱ्यावर मिळून 11 बंदरे आहेत. या कंपनीकडे  आधीपासूनच लक्ष्यधारक कंपनीचा 75% हिस्सा आहे. प्रस्तावित संयोजनाचा परीणाम म्हणून, अधिग्राहक कंपनीकडे 100% हिस्सा येईल आणि लक्ष्य कंपनीवर तिला  एकमेव नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

आंध्रप्रदेश सरकारकडून बांधा-संचालित करा- हस्तगत करा- स्थानांतरण करा (build,operate,share,transfer,BOST,बांधा,वापरा,हस्तांतरण करा)या सवलतीच्या तत्वावर आंध्रप्रदेशातील कृष्णापटनम या ठिकाणी  सर्व प्रकारच्या हवामानात, खोल पाण्यातील  बहुउद्देशीय बंदराची  विकासक आणि कार्यरत कंपनी म्हणून या लक्ष्य कंपनीला  नियुक्त केले आहे.

सीसीआयचा तपशीलवार आदेश पहा:

***

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719738) Visitor Counter : 108