रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेकडून 6000 व्या रेल्वे स्थानकावर वाय-फाय यंत्रणा कार्यान्वित


पाच वर्षात 1 ते 6000 स्थानकांमध्ये ही सुविधा देत भारतीय रेल्वेचे प्रवाश्यांच्या सुविधेत भर टाकण्यासाठी वेगवान पाउल

Posted On: 16 MAY 2021 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2021

 

भारतीय रेल्वेने आता 6000 व्या रेल्वे स्थानकावर वायफाय सुविधा कार्यान्वित केली आहे.

प्रवाशी आणि सर्वसामान्यांना डिजिटल व्यवस्थेशी जुळवून घेता यावे म्हणून रेल्वे दुर्गम स्थानकातही ही सुविधा देणार आहे.

झारखंड राज्यातील हजारीबाग जिल्ह्यातील हजारीबाग शहर या पूर्व-मध्य रेल्वेच्या धनबाद विभागातील स्थानकात आज वाय फाय सुविधा कार्यान्वित करत आज  रेल्वेने वाय फाय सुविधा असलेल्या 6000 स्थानकांचा  टप्पा पार केला आहे.

जानेवारी 2016 मध्ये भारतीय रेल्वेने मुंबई येथे वाय फाय सुविधा देत या उपक्रमाची सुरूवात केली. पश्चिम बंगालमधील मिदनापूर हे वाय फाय सुविधा मिळवणारे 5000वे स्थानक ठरले आणि आता हजारीबाग येथे आज वाय फाय सुरू करून ती संख्या 6000 स्थानंकांपर्यंच पोचवली आहे. आजच ओदिशा जिल्ह्यातील अंगुल विभागातील जरपदा स्थानकातही ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली.

रेल्वे स्थानकांवरील वायफाय सेवेमुळे भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे लक्ष्य गाठणे सोपे  झाले आहे. ग्रामीण भागातील डिजिटल पाऊलखुणा ठळक करत ग्रामीण व शहरी भागांमधील डिजिटल दरी दूर करण्याचे काम यामुळे होते, त्याचप्रमाणे वापरकर्त्यांच्या अनुभवविश्व विस्तारालाही चालना मिळते. रेल्वे स्थानकांवरील वाय फाय सुविधा ही कायमस्वरूपी असून त्याचा कोणताही आर्थिक भार रेल्वेवर पडत नाही. रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील रेलटेल या सार्वजनिक सेवा उपक्रमाच्या मदतीने ही सुविधा दिली जात आहे. गुगल, USOF च्या अखत्यारीतील दूरसंचार विभाग (DOT) , PGCIL व टाटा ट्रस्टच्या सहभागातून हे काम पूर्ण केले जात आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 550 रेल्वे स्थानकांवर वाय फाय सुविधा देण्यात आली आहे.

State-wise Wi-Fi faciity at stations as on 15.05.21

SN

State/UT

No. of Stations

1

Andhra Pradesh

509

2

Arunachal Pradesh

3

3

Assam

222

4

Bihar

384

5

UT Chandigarh

5

6

Chhattisgarh

115

7

Delhi

27

8

Goa

20

9

Gujarat

320

10

Haryana

134

11

Himachal Pradesh

24

12

Jammu & Kashmir

14

13

Jharkhand

217

14

Karnataka

335

15

Kerala

120

16

Madhya Pradesh

393

17

Maharashtra

550

18

Meghalaya

1

19

Mizoram

1

20

Nagaland

3

21

Odisha

232

22

Punjab

146

23

Rajasthan

458

24

Sikkim

1

25

Tamil Nadu

418

26

Telangana

45

27

Tripura

19

28

Uttar Pradesh

762

29

Uttarakhand

24

30

West Bengal

498

 

Total

6000

 

R.Aghor/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719097) Visitor Counter : 162