वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

लस उत्पादन वाढवण्याबाबतच्या उपाययोजनांविषयी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची युएसटीआर सोबत सकारात्मक चर्चा

Posted On: 14 MAY 2021 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 मे 2021


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज म्हणजेच 14 मे 2021 रोजी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी, कैथरिन ताई यांच्यासोबत दूर दृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.कोविड-19 च्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी लस उत्पादकता सर्वसमावेशक आणि समान पद्धतीने वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला होता. जागतिक पातळीवर लस उत्पादन वाढवण्यासाठी ट्रिप्स या बौद्धिक संपदाविषयक करारातल्या तरतुदी शिथिल करण्याच्या भारताच्या प्रस्तावावर देखील चर्चा झाली.या तरतुदी शिथिल झाल्यास, गरीब आणि विकसनशील देशांना देखील लसींचा पुरवठा होऊ शकेल आणि अनेकांचे प्राण वाचू शकतील, यावरही चर्चा झाली.

भारताच्या या प्रस्तावाला पाठींबा दर्शवल्याबद्दल, यावेळी गोयल यांनी USTR यांचे आभार मानले. लस उत्पादकांसाठी पुरवठा साखळी संपूर्ण जगभरातल्या उत्पादकांसाठी मुक्त आणि बंधमुक्त ठेवणे ही आज काळाची गरज आहे, असे गोयल म्हणाले. लस उत्पादकता वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करण्यावर दोन्ही बाजूनी यावेळी सहमती व्यक्त करण्यात आली.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718729) Visitor Counter : 115