आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदत साहित्याविषयी अद्यायावत माहिती


परदेशातून येणाऱ्या कोविडविषयक मदतसाहित्य जलद प्रक्रियामुक्त करुन, त्याचे वर्गीकरण करत, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे रवाना

10,000 पेक्षा अधिक ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, 12,000 पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स, 6,400 पेक्षा अधिक व्हेंटीलेटर्स/ Bi PAP, सुमारे 4.2 लाख रेमडेसीवीरच्या कुप्या आतपर्यंत मिळाल्या असून त्यांचे वितरणही पूर्ण

Posted On: 14 MAY 2021 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 मे 2021

 

कोविड-19 महामारीविरुद्धच्या लढ्यात, समग्र सरकार या नात्याने केंद्र सरकार या लढ्याचे नेतृत्व करत आहे. या लढ्यात, 27 एप्रिल 2021 पासून भारताकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरून  विविध देश/संस्थांकडून मदतीचा ओघ येतो आहे.अत्यंत सुनियोजित अशा यंत्रणेद्वारे केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभाग परस्परांशी समन्वय साधून जगभरातून येणाऱ्या या मदतीचे राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरण करत आहे.

आतापर्यंत म्हणजेच 27 एप्रिल ते 12 मे 2021 या काळात, भारतात, एकूण 10,796 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, 12,269 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स, 6,497 व्हेंटीलेटर्स/ Bi PAP, सुमारे 4.2 लाख रेमडेसीवीरच्या कुप्या आतपर्यंत मिळाल्या असून त्यांचे वितरणही पूर्ण  झाले आहे.

12/13 मे रोजी भारताला प्रामुख्याने इंडोनेशिया, लक्झेम्बर्ग, ओमान, दक्षिण कोरिया, अमेरिका, युएसआयएसपीएफ, फिनलैंड आणि  ग्रीस या देशांकडून मदत मिळाली आहे. यात--

- ऑक्सिजन काँसंट्रेटर्स: 1,506

- ऑक्सिजन सिलेंडर्स: 434

- व्हेंटीलेटर्स/ Bi PAP/ CPAP: 58

प्रभावी आणि त्वरित वितरण आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना आणि संस्थांपर्यंत योग्य वेळेत साहित्य पोचवण्याचे काम सातत्याने सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय या सर्व कामांवर नियमितपणे देखरेख ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही सामग्री स्वीकारणे आणि अनुदान, मदत अथवा दान स्वरुपात आलेल्या या सर्व मदत साहित्याचे वितरण करण्यासाठी एक समर्पित समन्वय कक्ष तयार केला आहे. 26 एप्रिल 2021पासून हा कक्ष कार्यरत आहे.  आरोग्य मंत्रालयाने या सगळ्या कामांसाठी 2 मे 2021 पासून एक प्रमाणित कार्यान्वयन पद्धती निश्चित आणि लागू केली आहे.

फोटो कॅप्शन   1. : इंग्लंडमधल्या ब्रिटीश ऑक्सिजन कंपनीकडून मिळालेले 150 ऑक्सिजन सिलेंडर्स आज भारतीय हवाई दलाच्या विमानाने पाटणा विमानतळावर पोहोचले.

फोटो कॅप्शन   2. : अमेरिकेने पाठवलेल्या रेमडेसीवीर औषधाच्या 29,514 कुप्या आज सकाळी मुंबई विमानतळावर पोचल्या असून, त्यांचे आता देशातल्या सर्व राज्यांत वितरण सुरु.

 

* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718675) Visitor Counter : 176