पोलाद मंत्रालय

पोलाद उद्योगांकडून  4686  मेट्रीक टन जीवरक्षक द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा

Posted On: 12 MAY 2021 8:51PM by PIB Mumbai

 

या संकटाच्या काळात  पोलाद  उद्योगक्षेत्र  देशसेवेसाठी एकजुटीने  उभे आहे. 10 मे रोजी पोलाद उद्योगक्षेत्राने  एकूण 4686 मेट्रीक टन जीवनरक्षक द्रवरूप वैद्यकीय  ऑक्सिजनचा  (एलएमओ) पुरवठा केला. यापैकी भारतीय पोलाद प्राधिकरणाकडून 1193 मेट्रीक टन , राष्ट्रीय पोलाद निगम मर्यादित कडून 180 मेट्रीक टन , टाटा समूहाकडून 1425 मेट्रीक टन , जेएसडब्लू कडून 1300 मेट्रीक टन पुरवठा झाला तसेच ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये  सार्वजनिक आणि  खाजगी क्षेत्रातील इतर पोलाद  कंपन्यांचा समावेश आहे. देशातील द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचे एकूण उत्पादन  प्रतिदिन / 9500 मेट्रीक टन इतके वाढले आहे , जे स्थापित क्षमतेच्या सुमारे 130% क्षमता वापर दर्शवत आहे.  द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनच्या राष्ट्रीय उत्पादनात पोलाद उद्योगांचे निम्मे योगदान आहे.

बहुतांश उद्योग नायट्रोजन आणि  आरगॉनचे  उत्पादन कमी करून द्रवरूप ऑक्सीजनचे उत्पादन वाढविण्यासाठी  विविध उपक्रम राबवत असून पोलाद उद्योग द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा वाढविण्यासाठी सक्षम आहेत. त्यांना त्यांच्या साठवण टाक्यांमध्ये साधारणपणे 3.5 दिवसांचा द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा संरक्षित साठा ठेवणे आवश्यक असते जो, ऑक्सीजन संयंत्रात काही समस्या निर्माण झाल्यास बाष्पीभवन करून वापरला जातो . द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी पोलाद  मंत्रालयाने पोलाद उत्पादकांशी सतत संपर्क ठेवून संरक्षित साठा ठेवण्याच्या दिवसांमध्ये 0.5 दिवसांनी कपात केली आहे.

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718146) Visitor Counter : 126